सिंधुदुर्ग जिल्ह्यात सातत्याने सामाजिक, सांस्कृतिक, महिला सक्षमीकरण, महिला रोजगार निर्मिती अशा विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या सौ. मानसी परब राणे यांना त्यांच्या सामाजिक व जनहिताच्या कार्याची दखल घेत त्यांना आज ९ ऑगस्ट रोजी क्रांती दिनानिमित महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ, मुंबई., कोकण बुक ऑफ रेकॉर्ड्स व यशश्री फाउंडेशन, सिंधुदुर्ग यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या कोकण कला व साहित्य गौरव संमेलन २०२६ कार्यक्रमात ‘कोकण हिरकणी कर्तृत्व पुरस्कार’ आज सिंधुदुर्गनगरी येथील आचार्य बाळशास्त्री जांभेकर पत्रकार भवन येथे मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.

सौ. मानसी परब राणे यांना शाल, श्रीफळ, मानपत्र व सन्मानचिन्ह देऊन जिल्हा परिषद अध्यक्ष प्रमोद कामत, ज्येष्ठ संगीतकार व गझलकार अतुल दिवे, सेवानिवृत्त उपमुख्य कार्यकारी अधिकारी विजय चव्हाण, सुप्रसिद्ध मराठी सिनेअभिनेत्री श्रुती पारकर, पर्यावरण क्षेत्रात उल्लेखनीय योगदानाबद्दल राष्ट्रपती पुरस्कार विजेते तुषार शिवशरण, ज्येष्ठ कलावंत दादा राणे – कोनस्कर, ज्येष्ठ मालवणी कवी दादा मडकईकर, प्रा.डॉ. बी.एन खरात यांच्या उपस्थित सन्मानपूर्वक प्रदान करण्यात आला.

सौ. मानसी परब राणे यांनी आजपर्यंत विविध क्षेत्रात योगदान देऊन त्यांनी सामाजिक क्षेत्रात स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे. तसेच अन्यायाला सामोरे जाणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांसाठीही त्यांनी सातत्याने योगदान दिले आहे. त्यांच्या या यशाबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत असून त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!