आज ९ वर्षांनी आमसभा गाजली ती वेगवेगळ्या विकास कामाच्या घोषणानी आणि प्रलंबित असलेल्या कामांनी. यात कोलगाव जिल्हा परिषद सदस्य मायकल डिसोझा यांनी कोलगाव आणि कुणकेरीच्या पाण्याच्या हक्कासाठी आमसभेत आवाज उठवीला.
आमसभेत हा महत्वाचा मुद्दा मांडताना मायकल डिसोझा यांनी स्पष्ट केले की ५७ कोटींच्या पाणीपुरवठा योजनेचे काम सुरु असले तरी यामध्ये कोलगाव आणि कुणकेरी या दोन्ही गावांचा कोणताही फायदा नसून या योजनेत मोठ्या प्रमाणात टक्केवारी व भ्रष्टाचाराचे आरोप होत आहेत.
जोपर्यंत कोलगाव आणि कुणकेरी या दोन्ही गावांना मुबलक पाणी मिळत नाही, तोपर्यंत पुढील काम करू देणार नाही, ही आमची ठाम भूमिका आहे. आमचा पाण्याचा प्रश्न सुटल्यास सर्व ग्रामस्थ या प्रश्नावर पूर्ण सहकार्य करतील.आमदार दीपक केसरकर यांनी या गंभीर मुद्द्यावर नगराध्यक्ष व उप नगराध्यक्ष यांच्या उपस्थितीत संयुक्त बैठक घेण्याचे आश्वासन या आमसभेत जिल्हा परिषद सदस्य मायकल डिसोझा यांना दिले..