जिल्हास्तरीय शालेय क्रीडा स्पर्धेत दोडामार्ग इंग्लिश स्कुल व ज्युनिअर कॉलेजच्या मुलींनी दमदार कामगिरी केली. जिल्हास्तरीय घेण्यात आलेल्या कब्बड्डी स्पर्धेत १७ वर्षाखालील मुलींच्या गटात बाजी मारली. त्यांनी तृतीय क्रमांक पटकावला.

त्यांच्या या यशाचे सर्वत्र कौतुक केले जात आहे. शिक्षण प्रसारक मंडळ सावंतवाडी चे अध्यक्ष तथा विद्यमान जिल्हा परिषद सदस्य विक्रांत सावंत यांनी यशस्वी विद्यार्थीनींचे कौतुक करत अभिनंदन केले.

हे यश एकट्याचे नसून सांघिक आहे.विद्यार्थ्यांचा अभिमान आहेच मात्र त्यांच्याकडून जी मेहनत करून घेतली त्या शिक्षक आणि प्रशिक्षक यांचा सुद्धा आपल्याला अभिमान आहे. विद्यार्थ्यांनी एवढ्या एकाच खेळावर लक्ष केंद्रित न करता अन्य खेळात देखील सहभाग घ्यावा. अध्यक्ष या नात्याने कोणतीही कमी पडू देणार नसल्याचा विश्वास यावेळी विक्रांत सावंत विद्यार्थ्यांना दिला.

You missed

error: Content is protected !!