सावंतवाडी : जिमखाना मैदानावर आयोजित क्रिकेट स्पर्धेमध्ये उपनगराध्यक्ष तथा प्रभारी नगराध्यक्ष अनिलजी निरवडेकर यांच्यासह ॲड. सिद्धार्थ भांबुरे, ॲड. नीता सावंत – कविटकर, ॲड. सायली दुभाषी या विजयी नगरसेवकांचा करण्यात आला सत्कार

आज सावंतवाडीचे जिमखाना मैदान क्रिकेटची पंढरी बनले होते. निमित्त होते ते युनायटेड सिंधुदुर्ग क्रिकेट टीम आयोजित पै.ॲड.अल सुहेब डिंगणकर स्मृती चषक सामन्यात रंगतदार क्रिकेटचे प्रदर्शन. सावंतवाडी जिमखाना मैदानावर आयोजित करण्यात आलेल्या वकिलांच्या क्रिकेट सामन्याचा आनंद आज क्रिकेट रसिकांनी मनमुराद लुटला. अंतिम सामन्यात सातारा क्रिकेट संघ विरुद्ध सांगली क्रिकेट संघ एकमेकांसमोर आले आणि चुरशीच्या स्पर्धेत सांगली संघावर मात करून सातारा क्रिकेट संघ विजेता ठरला.

दरवर्षी सावंतवाडीमध्ये युनायटेड सिंधुदुर्ग क्रिकेट टीमद्वारे पै.ॲड.अलसुहेब डिंगणकर स्मृतीचषकाचे क्रिकेट सामने भरवले जातात. यावर्षी भरवलेल्या या स्पर्धेचा शानदार समारोह सावंतवाडीच्या मैदानावर पार पडला. यावेळी झालेल्या बक्षीस वितरण कार्यक्रमासाठी मैदानावर भाजपा महाराष्ट्र युवा नेते तथा युवा उद्योजक विशालजी परब हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते.

यावेळी व्यासपीठावरून बोलताना भाजपा नेते विशालजी परब यांनी सुहेब डिंगणकर यांच्या आठवणींना पुन्हा उजाळा दिला. २०११ पासून आपले या स्पर्धेला सहकार्य असल्याचे तसेच सावंतवाडी बार असोसीएशन सोबत आपण पुणे मुंबई येथेही स्पर्धेसाठी उपस्थित राहायचो असेही आवर्जून नमूद केले. यावेळी सावंतवाडी नगर परिषदेवर चार नगरसेवक अभ्यासू वकिलांमधून निवडून गेल्याचा आनंद मला आहे असेही ते म्हणाले. उपनगराध्यक्ष तथा प्रभारी नगराध्यक्ष अनिलजी निरवडेकर यांच्यासह ॲड. सिद्धार्थ भांबुरे, ॲड. नीता सावंत – कविटकर,ॲड. सायली दुभाषी या विजयी नगरसेवकांचा आज इथे सत्कार करतांना होणारा आनंद हा मनापासून असल्याचे त्यांनी यावेळी बोलताना सांगितले.

यावेळी श्री विशाल परब यांच्यासह सावंतवाडी नगराध्यक्ष ॲड.अनिलजी निरवडेकर, ॲड.परिमल नाईक जिल्हा अध्यक्ष वकील संघटना, ज्येष्ठ वकील ॲड. दिलीप नार्वेकर, ॲड. डी.के. गावकर, ॲड. सौ.नीता सावंत-कविटकर, ॲड.सिद्धार्थ भांबुरे, ॲड.सायली दुभाषी, मुख्य आयोजक ॲड.अनिल केसरकर. अण्णा बांदेकर यांच्यासह युनायटेड सिंधुदुर्ग क्रिकेट टीमचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!