सावंतवाडी : वैश्यवाडा कला क्रीडा मंडळ यांनी पहिल्यांदाच आयोजित करण्यात आलेल्या वैश्यवाडा प्रीमियम लीगला मोठा प्रतिसाद लाभला. ही स्पर्धा रविवारी २५ जानेवारी रोजी तनुष स्पोर्ट्स क्लब ( टर्फ ) येथे आयोजित करण्यात आली होती.
या लीगसाठी विजेत्याला नेवगी परिवाराकडून कै. राकेश नेवगी स्मृती प्रित्यर्थ रोख १००२६ रुपयांचे पारितोषिक व आकर्षक चषक, तर उपविजेत्या संघाला नगरसेविका सौ. मोहिनी मडगांवकर यांचेकडून ७०२६ चे रोख पारितोषिक व आकर्षक चषक, मालिकावीर व सामनावीरसाठी नगरसेविका सौ. नीलम परिमल नाईक पुरस्कृत, उत्कृष्ट फलंदाज, उत्कृष्ट गोलंदाज व उत्कृष्ट क्षेत्ररक्षक यासाठी वैश्यवाडा हनुमान मंदिर उत्सव समिती कडून पारितोषिक ठेवण्यात आली होती.
या प्रीमियम लीगमध्ये वैभव म्हापसेकर यांचा युनायटेड डेविल्स, दीपक म्हापसेकर व बंड्या सुकी यांचा बिडी वारियर्स, वैशाख मिशाळ यांचा गोल्ड फिश इलेव्हन, धिरज व गजानन सुकी यांचा एन. व्ही. बॉयज, धिरेंद्र म्हापसेकर यांचा श्रील वारियर्स, व राहुल व अंकिता नेवगी यांचा फियरलेस फायटर्स असे एकूण सहा संघ सहभागी झाले होते.
पहिल्यांदा आयोजित केलेल्या या वैश्यवाडा प्रीमियर लीग चा पहिला वहिला विजेता संघ हा एन. व्ही. बॉयज आणि उपविजेता संघ हा युनायटेड डेवील्स ठरला. या संपूर्ण स्पर्धेला क्रीडा रसिकांचा, वैश्यवाड्यातील, ग्रामस्थांचा फार मोठा प्रतिसाद लाभला.
