सावंतवाडी : श्री ब्राम्हणदेव परिसर मित्रमंडळ सावंतवाडी, श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ अक्कलकोट श्री स्वामी समर्थ पालखी पादुका परिक्रमा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. २ दिवस हा कार्यक्रम असणार आहे. बुधवार दिनांक २८ जानेवारी २०२६ रोजी सकाळी १० वाजता स्वामी पालखी पादुकांचे आगमन, सायंकाळी ४ वाजता स्वामी पालखी पादुकांची सावंतवाडी शहरामध्ये मिरवणूक, सायंकाळी ७ वाजता आरती, दर्शन व महाप्रसाद व रात्रौ सात पाटेकर, निरवडे यांचा दणदणीत नाट्यप्रयोग होणार आहे.गुरुवार २९ जानेवारी २०२६ रोजी पहाटे ५ वाजता स्वामी पालखी पादुकांची पूजा व अभिषेक, सकाळी ८ वाजेपर्यंत स्वामी पादुका दर्शन होणार आहे. असे २ दिवस कार्यक्रम होणार आहेत. तरी जास्तीत जास्त भाविक भक्तांनी या दर्शनाचा आणि प्रसादाचा लाभ घ्यावा असे श्री देव ब्राम्हण देव परिसर मित्रमंडळ भटवाडी, सावंतवाडी यांच्यावतीने आवाहन करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी, ९४२१६३४३३४, ९४२०९७९७८९ या क्रमांकावर साधायचा आहे..
