सावंतवाडी: जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका ह्या भाजप आणि शिवसेना ( शिंदेसेना ) युतीच्या माध्यमातून लढवीत आहेत. कोलगाव जिल्हा परिषद भाजप साठी तर पंचायत समिती शिवसेना (शिंदेसेना ) यांना सुटली आहे. पंचायत समितीच्या या निवडणुकीसाठी युतीच्या अधिकृत उमेदवार प्रणाली टिळवे यांनी अर्ज सादर करत निवडणुकीच्या रींगणात उतरल्या आहेत. कोलगाव ग्रामपंचायत च्या विद्यमान सदस्या असल्याने प्रशासकीय ज्ञान आणि जनतेशी असलेले चांगले संबंध यामुळे आपला विजय निश्चित असल्याचे प्रणाली टिळवे यांनी सांगितले..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!