सावंतवाडी : परंपरा, विश्वास व गुणवत्ता यांची नवीन ओळख म्हणजे दिविशा साडी कलेक्शन.या दिविशा साडी कलेक्शन चा शुभारंभ २२ जानेवारी रोजी झाला होता. या साडी कलेक्शन मध्ये पैठणी, कांजीवरम, कांचीपुरम, गडवाल, धर्मावरम, महेश्वरी, नारायणपेठ, जिजामाता, बनारसी, कलमकारी, चिकनकारी, एम्ब्रायडरी, चंदेरी, इंदोरी, पटोला, इरकल अश्या प्रत्येक राज्यातील खास २० पेक्षा जास्त प्रकारच्या साड्या उपलब्ध आहेत. या शुभारंभ प्रसंगी २२ जानेवारी ते २४ जानेवारी पर्यंत विशेष ऑफर लावण्यात आली होती. मात्र ग्राहकांच्या वाढत्या मागणीनुसार ही ऑफर आता ३० जानेवारीपर्यंत वाढविण्यात आली आहे. ५००० च्या खरेदीवर १०, ००० ची पैठणी साडी मिळविण्याची सुवर्ण संधी पुन्हा एकदा उपलब्ध करण्यात आली आहे. तसेच प्रत्येक साडीवर ३० जानेवारीपर्यंत १०% सूट देण्यात येणार आहे. या सुवर्ण संधीचा जास्तीत जास्त महिलांनी लाभ घेण्याचे आवाहन या दिविशा साडी कलेक्शन च्या सर्वेसर्वा पल्लवी जयेश स्वार यांनी केले आहे. विठ्ठल मंदिरच्या मागे, ठाणे जनता सहकारी बँक समोर उभाबाजार सावंतवाडी असा या दिविशा साडी कलेक्शन चा पत्ता आहे. अधिक माहितीसाठी ७५८८४४८१५६ या क्रमांकावर साधावा अशी माहिती पल्लवी जयेश स्वार यांनी दिली..
