सावंतवाडी : भाजप पक्षात प्रवेश करत बंडखोरी करत मायकल डिसोझा यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता. तो अर्ज त्यांनी कायम ठेवला आहे. यामुळे कोलगाव जिल्हा परिषद मतदार संघात पुन्हा मायकल डिसोझा आणि महेश सारंग यांचा थेट सामना रंगणार आहे. दरम्यान आज चिन्ह वाटप करण्यात आलंय. मायकल डिसोझा यांना नारळाचे चिन्ह मिळाले आहे..
