सावंतवाडी : कोलगाव जिल्हा परिषदचे महायुतीचे अधिकृत उमेदवार महेश सारंग यांनी कोलगाव गावचे ग्रामदैवत श्री देवी सातेरी, श्री देव कलेश्वर चरणी श्रीफळ अर्पण करत प्रचाराला जोरदार सुरुवात केली. त्याचप्रमाणे कोलगाव पंचायत समिती पदाच्या उमेदवार संध्या संदिप हळदणकर या देखील यावेळी उपस्थित होत्या.

यावेळी कोलगाव जिल्हा परिषद मध्ये केलेल्या विकास कामांच्या जोरावर, कार्यकर्ते घेत असलेली मेहनत, भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना ( शिंदे गट ) या पक्षातील असलेल्या वरिष्ठ नेत्यांचा आशीर्वाद आणि पाठबळ,जनतेशी जोडलेली नाळ यामुळे आपला विजय निश्चित आहे असे यावेळी जिल्हा परिषद चे उमेदवार महेश सारंग आणि पंचायत समितीच्या उमेदवार संध्या हळदणकर यांनी व्यक्त केला. यावेळी महायुतीतील पदाधिकारी, कार्यकर्ते आणि कोलगाव गावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!