सावंतवाडी : माजी जिल्हा परिषद सदस्य मायकल डिसोझा पुन्हा एकदा निडणुकीला सामोरे जात आहेत. कोलगाव जिल्हा परिषद निवडणुकीत ते नारळ या चिन्हावर अपक्ष निवडणूक लढवीत आहेत.कोलगाव गावचे ग्रामदैवत श्री देवी सातेरी, श्री देव कलेश्वर चरणी श्रीफळ अर्पण करत आपल्या प्रचाराला सुरुवात केली आहे. मतदारांमध्ये नवचैतन्य निर्माण करत आपण ही निवडणूक लढवीत आहे आणि आपला विजय हा निश्चित आहे असे यावेळी त्यांनी सांगितले. यावेळी मोठया प्रमाणात कार्यकर्ते उपस्थित होते..
