सावंतवाडी : युतीच्या माध्यमातून भारतीय जनता पार्टी, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी एकत्र येत जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुका लढवीत आहेत. निवडणुकीची तारीख जसजशी जवळ येत आहे तसतशी प्रचाराची रंगत वाढत चालली आहे. तळवडे जिल्हा परिषद मतदार संघात मळगाव पंचायत समितीचे उमेदवार गौरव गोपाळ मुळीक यांनी जोरदार आघाडी घेतली आहे. लोकांचा पाठिंबा दिवसेंदिवस वाढत चालला आहे. युतीचे सर्वच कार्यकर्ते एकदिलाने प्रचार करताना पाहायला मिळत आहेत.या मिळत असलेल्या पाठिंब्यामुळे आपला विजय नक्कीच होणार. मोठ्या मताधिक्याने जनतेच्या आशीर्वादाने यशाला गवसणी घालणार असे यावेळी मळगाव पंचायत समिती सदस्य पदाचे उमेदवार गौरव गोपाळ मुळीक यांनी सांगितले. यावेळी युतीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.
