सावंतवाडी : सावंतवाडी पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणुकीत तळवडे गणातून, प्रज्ञा प्रकाश जाधव निवडणुकीला सामोरी जात आहेत
सावंतवाडी पंचायत समितीचे सभापती पद अनुसूचित जातीसाठी आरक्षित आहे. ही निवडणूक फक्त पदासाठी नसून, सामान्य माणसाच्या न्यायासाठी आणि हक्कासाठीची आहे.आपल्या सावंतवाडी–तळवडे भागातील लोकांचे प्रश्न मला चांगले माहिती आहेत. पावसाळ्यात खराब होणारे रस्ते,
पिण्याच्या पाण्याची टंचाई, वीज खंडित होण्याचे त्रास,
शेती, बागायती आणि मोलमजुरीवर जगणाऱ्या कुटुंबांच्या अडचणी, आणि इथल्या महिलांना व तरुणांना मिळणारा अपुरा रोजगार,पाणी, वीज आणि रस्ते या मूलभूत सुविधा दर्जेदार व कायमस्वरूपी मिळाव्यात, यासाठी मी सातत्याने पाठपुरावा करेन,स्थानिक महिलांना व तरुणांना याच भागात रोजगार मिळावा, यासाठी बचत गट, स्वयंरोजगार आणि शासकीय योजना प्रत्यक्षात आणण्यासाठी प्रयत्न करेन,शेतकरी, बागायतदार, मजूर आणि गरिबांचे प्रश्न पंचायत समितीच्या सभागृहात ठामपणे मांडेन,मी सत्तेसाठी नाही,
तुमच्या सुख-दुःखात सहभागी होण्यासाठी,
आणि आपल्या भागाचा प्रामाणिक व सर्वांगीण विकास करण्यासाठी निवडणूक लढवत आहे. मला एकदा संधी द्या.
तुमचा विश्वास हाच माझा खरा आधार आहे.असे मत यावेळी प्रज्ञा जाधव यांनी व्यक्त केले..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!