सावंतवाडी : तळवडे जिल्हा परिषद आणि पंचायत समिती सदस्य पदाच्या निवडणुकीत जोरदार लढाई सुरु झाली आहे. एकीकडे भाजप आणि शिवसेना ( शिंदेसेना ) यांचं पक्षीय संघटन तर दुसरीकडे इतर पक्षांनी लावलेली ताकद हे या निवडणुकीचे वैशिष्ट्य पाहायला मिळत आहे. तळवडे मतदार संघ हा कैलासवासी प्रकाश परब यांच्या विचारांवर चालणारा मतदारसंघ म्हणून ओळखला जातो.या मतदार संघातून जिल्हा परिषद साठी संदिप गावडे तर पंचायत समीतीसाठी सुस्मिता जाधव रिंगणात आहेत. दोघांना या मतदार संघात मोठा जनाधार मिळत आहे. पंचायत समिती सभापती पद हे अनुसूचित जाती महिला साठी राखीव आहे. तळवडे पंचायत समिती मतदार संघ हा अनुसूचित जाती महिला राखीव पडल्याने येथे जवळपास ४ उमेदवार रिंगणात आहेत. मात्र युतीच्या अधिकृत उमेदवार सुस्मिता जाधव यांनी प्रचारात जोरदार मुसंडी मारली आहे. घरोघरी जात त्यांनी प्रचारावर भर दिला आहे. कै. प्रकाश परब यांचे आशीर्वाद, युतीच्या नेत्यांचे आशीर्वाद आणि जनतेचा जनाधार, कार्यकर्त्यांची मेहनत यामुळे आपण नक्कीच विजयी होऊ असा विश्वास यावेळी सुस्मिता जाधव यांनी व्यक्त केला.यावेळी कै. प्रकाश परब यांचे चिरंजीव, शिवसेनेचे ( शिंदेसेना ) पदाधिकारी सूरज परब, जिल्हा बँक संघालक विद्याधर परब, पंकज पेडणेकर आणि पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात उपस्थित होते..
