सावंतवाडी : भारतीय जनता पक्ष हा सर्वसामान्य जनतेचा पक्ष आहे. सर्वसामान्य जनता हाच पक्षाचा केंद्रबिंदू आहे.येणारी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणूक ही जनतेची असणार आहे. जनता पाठीशी त्यामुळे विजय गाठीशी नक्कीच आहे असे प्रचारादरम्यान तळवडे जिल्हा परिषद मतदार संघांचे महायुतीचे उमेदवार संदीप गावडे यांनी मत व्यक्त केले. जनता पाठीशी असताना आपल्याला कोणत्याही प्रकारची भीती नाही. जनता आपल्या मताने सर्व प्रश्नांना उत्तर देईल. मी अजून काही बोलणार नाही असे मत यावेळी संदिप गावडे यांनी व्यक्त केले. यावेळी मळगाव पंचायत समिती सदस्य पदाचे उमेदवार गौरेश मुळीक, सावंतवाडी नगरपरिषदेचे विद्यमान नगरसेवक ऍड. अनिल निरवडेकर, विनोद राऊळ, माजी सरपंच गणेशप्रसाद पेडणेकर, सिद्धेश तेंडोलकर, निलेश कुडव, निलेश राऊळ, निकिता राऊळ, लक्ष्मण गावकर, संदेश सोनुर्लेकर, महेश गवंडे इ. पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
