सावंतवाडी : इन्सुलि जिल्हा परिषद साठी महायुतीचे अधिकृत उमेदवार शावियर फर्नांडीस रिंगणात आहेत. गेली अनेक सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक, क्रीडा क्षेत्रात भरीव असे योगदान त्यांनी आपल्या माध्यमातून दिलेले आहे. अगदी युवांपासून ते वृद्धा पर्यंत जोरदार पाठिंबा हा शावियर यांना मिळत आहे. या मतदारसंघात मुख्य विषय हा रोजगाराचा आहे. केवळ एक कारखाना सोडला तर इथे कारखाना नाही आहे. आज जे युवा गोव्यात कामाला जात आहेत त्यांच्यासाठी या मतदार संघात रोजगार निर्मिती साठी प्रयत्न असणार आहे. यासाठी ही निवडणूक लढवीत आहे. या निवडणुकीत सर्वांच्या आशीर्वादाने आपला विजय हा नक्कीच होईल. युतीतील जे वरिष्ठ नेते आहेत त्यांच्या पाठिंब्याने आपला विजय अधिक सुखकर होईल असेही मत यावेळी त्यांनी व्यक्त केले. इन्सुलि, निगुडे, रोणापाल, शेर्ले, कास, वाफोली, डेगवे या गावांच्या उज्वल भवितव्यासाठी आपल्याला विजयी करा असे आवाहन आज निगुडे येथे श्री देवी माऊली, रवळनाथ येथे श्री फळ अर्पण त्यांनी मतदारांना केले. यावेळी नारायण राणे, निगुडे सरपंच लक्ष्मण निगुडकर, समीर गावडे, पंचायत समिती सदस्य पदाचे उमेदवार रामचंद्र विष्णू चराटकर आदि युतीचे पदाधिकारी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते..
