माझ्या विरोधात
सगळ्यांना एकत्र यावं लागतं यातच माझा विजय.भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून या मतदारसंघात झालेल्या विकास कामांच्या जोरावर जनता मला आशीर्वाद देणार.त्यांच्या मागे कोणाची ताकद आहे हे मला माहित नाही,पण ९ फेब्रुवारी ला गुलाल हा माझाच असणार. मी जर कोणाला धमक्या देत असेल किंवा पदाचा गैरवापर करत असेल तर त्यांनी माझी पोलीस स्टेशनला तक्रार करावी.इतक्या दिवस ते वकील नव्हते, परंतु आता निवडणुक आल्यावर त्यांच्या पत्रकावर अँड. असा उल्लेख आहे त्यामुळे ते नक्की वकील आहेत की नाही ते मला तपासाव लागेल.माझ्या घरात किती पद आहेत हे त्यांनी तपासावे. उगाच काहीतरी आरोप करू नये.आज त्यांनी किती पक्ष बदललेत हे जनतेला माहित आहे,ज्या ज्या पक्षात ते गेले ते ते पक्ष संपलेत. महेश सारंग यांचा विरोधकांवर जोरदार घणाघात..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!