आता समोर कोणतेही मोठी शक्ती कोणत्याही स्वरूपात येऊ द्या, तुमच्यासारख्या निष्ठावान कार्यकर्त्यांसमोर ती काहीच नाही. निष्ठा जिंकेल आणि जी काही मोठी शक्ती असेल तर ती नक्कीच हरेल यात कोणतीही शंका नाही. माझ्या निवडणुकीत याच शक्तीचा वापर करण्यात आला मात्र याला शिवसैनिकांच्या निष्ठेने उत्तर दिले.
तळवडे जिल्हा परिषद मतदार संघात आणि पंचायत समिती मतदार संघातील जे आपले उमेदवार आहेत ते नक्कीच निवडून येतील. असा ठाम विश्वास ठाकरे सेनेचे आमदार महेश सावंत यांनी व्यक्त केला.ते तळवडे जिल्हा परिषद आणि पंचायत समिती पदाच्या निवडणुकीच्या प्रचाराला आज उपस्थित होते. ज्या ज्या वेळी निष्ठेचा विषय येतो त्या त्या वेळी रुपेश राऊळ यांचा नाव अग्रक्रमांकावर नेहमीच असत आणि ते कायम राहणार आहे. जिल्हा परिषद निवडणुकीत ते नक्कीच विजयी होतील कारण तुम्ही सर्व निष्ठावान शिवसैनिक आणि ही जनता निवडून आणणार आहात.
असेही यावेळी महेश सावंत यांनी आपले मत व्यक्त केले.
मी स्थानिक उमेदवार असल्याने इथली जनता माझ्याच बाजूने उभी राहणार आहे यात कोणतीही शंका नाही. इथला विकास साधायचा असल्याने स्थानिक व्यक्तीची आवश्यकता आहे.त्यामुळे ७ तारिखला मतदार करताना कोणता उमेदवार तुमच्या हाकेला लवकर पोचेल याचा विचार करून मतदान करा आणि ते तुम्ही कराल असा विश्वास जिल्हा परिषद सदस्य पदाचे उमेदवार रुपेश राऊळ यांनी व्यक्त केला. यावेळी पंचायत समिती पदाचे उमेदवार पांडुरंग राऊळ, ठाकरे सेनेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते..
