Screenshot

जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीचे चित्र स्पष्ट झाले. अनेक उमेदवार भरघोस मतांनी तर काही उमेदवार हे काट्यावर पास झाले. मात्र या स्थानिक निवडणुकीत नोटा हा पर्याय विशेष भाव खाऊन गेला..

या स्थानिक निवडणुकीत बऱ्याच उमेदवारांनी नोटा चा पर्याय स्वीकारला. ही खरी तर चिंतेची बाब आहे. काही ठिकाणी १०० ते २०० च्या आसपास ही आकडेवारी आहे. एखाद्या उमेदवाराची हार जीत ही आकडेवारी निश्चितच ठरवू शकणारी होती. एवढ्या मोठ्या प्रमाणात नोटा चा पर्याय जर समोर येत असतील तर जे उमेदवार एखादा पक्ष देतो त्यांना विचार करण्याची गरज बनलेली आहे निदान स्थानिक निवडणुकीत तरी.

जेव्हा कोणताच उमेदवार योग्य वाटत नाही तेव्हा नोटा चा वापर होतो. मात्र एखाद्या चांगल्या उमेदवाराला खरोखरच जर धडा शिकवायचा असेल तर आता नोटा हा पर्याय सोयीचा मानला जात आहे. लोकशाहीला ही घातक बाब ठरू शकते. पुन्हा एकदा लोकांमध्ये मतदानाप्रति जनजागृती होणे गरजेचे आहे. एखादा उमेदवार लोकांच्या पसंतीस पडणं न पडणं हे त्याने केलेल्या कामांमुळे किव्हा आश्वासनांमुळे ठरते मात्र नोटा चा वापर करून एखाद्या चांगल्या उमेदवाराचे अस्तित्व तर संपुष्टात येत नाही नां याचा देखील विचार होणे गरजेचे बनत चालले आहे..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!