कोलगाव माध्यमिक विद्यालयाच्या स्काऊट गाईड चळवळीने यंदाही आपली उज्वल यशपरंपरा कायम राखले आहे. विद्यालयातील कुमार दत्तराज सदाशिव सुतार व कुमार गणेश राजाराम कानसे या दोन स्काऊट्सना तसेच कुमारी अपेक्षा आपा राऊळ,कुमारी तनिष्का सोनू कदम व कुमारी हर्षदा आशिष
माईनकर या तीन गाईर्ड्सना महाराष्ट्र राज्य भारत स्काऊट्स व गाईड संस्था मुंबई यांचा प्रतिष्ठेचा राज्य पुरस्कार जाहीर झाला आहे.या विद्यार्थ्यांची राज्य पुरस्कारासाठी ची अंतिम चाचणी राज्यस्तरीय प्रशिक्षण केंद्र सोनतळी जिल्हा कोल्हापूर येथे पार पडली. या शिबिरात विविध कौशल्य चाचण्या,सामाजिक सेवा उपक्रम, नेतृत्व गुण,शिस्तबद्ध कार्य, आपत्ती व्यवस्थापन व समाज उपयोगी कार्य या सर्व बाबींमध्ये विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट कामगिरी करून यश संपादन केले . या यशामागे विद्यालयाचे मुख्याध्यापक व स्काऊट मास्टर श्री अरविंद मधुकर मेस्त्री, व गाईड कॅप्टन सौ संगीता संजय महापुरे यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. तसेच सिंधुदुर्ग जिल्हा भारत स्काऊट व गाईड संस्था ओरस येथील जिल्हा संघटक सौ अंजली माहुरे व श्री सोमनाथ गायकवाड यांचेही विशेष सहकार्य मिळाले. या उल्लेखनीय यशाबद्दल कोलगाव शिक्षण प्रसारक मंडळ कोलगाव संस्थेचे अध्यक्ष श्री रविकिरण पुरस्कर सर्व संचालक मंडळ शाळेतील शिक्षक वृंद शिक्षकेतर कर्मचारी व पालक वर्ग यांनी राज्य पुरस्कार प्राप्त विद्यार्थ्यांचे मनःपूर्वक अभिनंदन करून त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
