अपक्ष उमेदवार मायकल डिसोझा यांनी महायुतीचे अधिकृत उमेदवार महेश सारंग यांना पराभवाचा धक्का दिला होता. प्रचाराच्या दरम्यान अदृश्य शक्तीचा हात आपल्या मागे असल्याचे त्यांनी वारंवार सांगितले होते. त्यांचा हा विजय हा याच अदृश्य शक्तिमुळे झाला अशी सर्वत्र चर्चा होती. ती अदृश्य शक्ती कोण हे आज स्पष्ट झाले. किंगमेकर चा बॅनर लावत मायकल डिसोझा यांनी रवींद्र चव्हाण यांचा फोटो लावला. रवींद्र चव्हाण हे भाजप पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आहेत. मात्र अपक्ष उमेदवार मायकल डिसोझा यांच्या बॅनर वरील त्यांचा फोटो पाहून अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. मायकल डिसोझा यांना भाजप पक्षातून निलंबित केले आहे. अश्यावेळी मायकल डिसोझा यांच्या बॅनर वर रवींद्र चव्हाण यांचा लागलेला फोटो हा निलंबन मागे घेऊन त्यांना पुन्हा भाजप पक्षात घेतले जाणार असे सुतोवाच तर नाही ना.. एकीकडे युतीचे उमेदवार पाडून अपक्षांना निवडून आणले गेले याचा राग युतीच्या सर्व कार्यकर्त्यांच्या मनात आहे. यामुळे हा बॅनर त्यांच्या जखमेवर मीठ चोळल्याचा प्रकार आहे. मात्र निवडणुकीच्या दरम्यान अदृश्य शक्ती मागे असल्याचे मायकल डिसोझा जे बोलत होते ते आज प्रत्यक्षात बॅनर वर अवतरले अशी जोरदार चर्चा सुरु झाली आहे..
