मेरा युवा भारत, सिंधुदुर्ग युवक कल्याण क्रीडा मंत्रालय आणि युवा कार्यक्रम व क्रीडा मंत्रालय, भारत सरकार यांच्या संयुक्त विद्यमाने आणि सिंधुदुर्ग जिल्हा उपसंपादक श्री कालिकादास घाटवाळा सर यांच्या नेतृत्वाखाली सावंतवाडी पंचायत समिती येथे युवक मंडळ विकास अभियानाचा औपचारिक शुभारंभ उत्साहात संपन्न झाला. या कार्यक्रमाचे उद्घाटन मा. गटविकास अधिकारी वासुदेव नाईक यांच्या शुभहस्ते करण्यात आले.या वेळी मेरा युवा भारत सिंधुदुर्गचे स्वयंसेवक जयराम जाधव, फिजा मकानदार, भाविका कदम, नासिर मकानदार, श्रुती सावंत, फातिमा मकानदार तसेच पत्रकार रुपेश पाटील यांच्यासह अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.युवकांच्या सर्वांगीण विकासाला चालना देण्यासाठी हे अभियान महत्त्वपूर्ण पाऊल ठरणार असल्याचा विश्वास यावेळी मा.गटाविकास अधिकारी वासुदेव नाईक यांनी व्यक्तव केले. उपक्रमामुळे स्थानिक युवक मंडळांना दिशा, संधी आणि शासकीय योजनांची जोड मिळून सामाजिक व नेतृत्व विकासाला गती मिळेल, अशी अपेक्षाही कु.फिजा मकानदार हिने व्यक्त केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!