वेंगुर्ला गवळीवाडा रस्त्याचा शुभारंभ जिल्हा बँक अध्यक्ष मनिष दळवी यांच्या हस्ते आज करण्यात आला. गेली अनेक वर्षे या रस्त्याची मागणी स्थानिक नागरिकांकडून केली जात होती. या रस्त्यासाठी नगरसेवक शीतल आंगचेकर व प्रणव वायंगणकर यांनी सातत्याने प्रयत्न केले होते. अखेर आज या रस्त्याचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी स्थानिक रहिवाशी यांनी समाधान व्यक्त केले. या वेळी जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी तालुका अध्यक्ष, उपसरपंच पप्पू परब,नगराध्यक्ष दिलीप गिरप उपनगराध्यक्ष सुहास गवंडळकर, नगरसेवक शीतल आंगचेकर,नगरसेविका सुषमा खानोलकर, रिया केरकर, आकांक्षा परब, प्रणव वायंगणकर, युवराज जाधव, सचिन शेट्ये कॉन्ट्रॅक्टर गणेश जाधव, आणि स्थानिक रहिवासी उपस्थित होते..
