गेली ३० वर्ष मळगाव सावंतवाडी रेल्वे स्टेशन सुरू होऊन सावंतवाडी एसटी प्रशासनाने बांदा पंचक्रोशीतून एसटी फेऱ्या सुरू करण्याबाबत कोणत्याही प्रकारे निर्णय घेतला नाही. बांदा व इन्सुली पंचक्रोशीतून सन २०१७ पासून एसटी सुरू करण्याबाबत प्रयत्न केले जात होते परंतु एसटी प्रशासनाने अद्याप पर्यंत त्याला साथ दिली नाही.फक्त आश्वासने देऊन डोळ्यात धूळफेक केली. याच विरोधात बांदा पंचक्रोशीतील सर्व जनता व सन्माननीय सरपंच एकवटले असून सुमारे अडीच हजार माणसे उद्या सकाळी १०:०० वाजल्यापासून सावंतवाडी प्रशासना विरोधात सावंतवाडी आगार येथे उपोषण स्थळी येणार आहेत. आज संध्याकाळी ०७:०० वाजल्यापासून सावंतवाडी आगारांसमोर उद्याची तयारी तंबू ठोकण्याची काम सुरू होणार आहे. त्यासाठी इन्सुली व बांदा पंचक्रोशीतील जनतेने जास्तीत जास्त संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन गुरुदास गवंडे यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!