कोकणी माणूस कुठेही असला तरी दोन सणांना आवर्जून उपस्थित राहतोच एक म्हणजे गणेशोत्सव तर दुसरा म्हणजे शिगमोत्सव.हे दोन्ही सण कोकणी माणसाच्या अगदी जिव्हाळ्याचे मानले जातात. त्यात खास करून कोकणामध्ये शिगमोत्सवाची धूळ मोठ्या प्रमाणात पाहायला मिळते. शीगमोत्सवामध्ये देव आपल्या घरी येतात त्याची यथा सांग पूजा केली जाते. काही ठिकाणी शिगमोत्सवा पाच दिवस, सात दिवस,नऊ दिवस,पंधरा दिवस,एकवीस दिवस असा साजरा केला जातो.पहिल्या दिवशी आंब्याची, सावर, भेलडा माड यासारख्या झाडांची होळी करून त्याची यथा सांग पूजा करून होळीच्या सणाला सुरुवात केली जाते. गावातील रीतीप्रमाणे पूजा झाल्यावर देवांना हळदीच्या पाण्याची अंघोळ घातल्यावर या सिग्मोत्सवातील महत्त्वाच्या कार्याला सुरुवात होते. त्याला हळदवणी असं म्हटलं जातं.हळदवणी झाल्यानंतर प्रत्येक गावातील देव निशान घेऊन गावातील प्रत्येकाच्या दारोदारी जाऊन भेट घेत असतात. प्रत्यक्षात देवाचा निशाण भेटीला येत असल्यामुळे फार मोठा आनंदाचा सोहळा साजरा करण्यात येतो. या शिगमोत्सवाच्या काळात गावांमध्ये फार मोठ्या प्रमाणात उत्साहाच वातावरण असतं. या उत्सवासाठी मुंबई स्थित कोकणी माणूस आवर्जून येतोच.काही गावातील मंडळी किंवा मुंबईतील चाकरमानी होळीकडे नवस बोलतात. हे नवस पूर्ण झाल्यानंतर त्या नवसाची परत फेड करण्यासाठी होळी कडे येऊन आपला मान देतात. प्रत्येक गावामध्ये वेगवेगळ्या चालिरिती पाहायला मिळतात. मात्र शिगमोत्सवाच्या काळात सर्वत्र आनंदाचे वातावरण पाहायला मिळते. काही तरुण,हौशी युवकांकडून कोणत्याही प्रकारचे अनुचित कार्य घडू नये यासाठी शासनाकडून देखील खबरदारी घेतली जाते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!