सावंतवाडी शहरासाठी ५ कोटी खर्च करुन क्रीडा संकुल मंजूर झालं असून नवीन काही खेळाच्या सुविधा तिथे उपलब्ध होणार आहे. इन डोअरसह आऊट डोअर खेळही तिथे उपलब्ध होणार असल्याची माहिती माजी मंत्री आमदार दीपक केसरकर यांनी दिली. तसेच विकासकामात राजकारण येता नये ही माझी भूमिका आहे. आरोप करण्यापासून मी अलिप्त असतो. न.प.त सत्ताधारी आणि विरोधकांत समन्वय घडवून आणण्याचा मी प्रयत्न करेन. तर व्हायरल ऑडिओ मी ऐकलेला नसून त्याबद्दल बोलणं उचित नाही असे श्री. केसरकर यांनी सांगितले. पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांवर उत्तर देताना आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

श्री. केसरकर म्हणाले, शहरासाठी ५ कोटी खर्च करुन क्रीडा संकुल मंजूर झालं असून नवीन काही खेळाच्या सुविधा तिथे उपलब्ध होणार आहेत. अतिरिक्त ७ कोटी त्यासाठी मंजूर झालेत. सेमी ऑलिम्पिक मार्गासह विविध इनडोअर खेळ यात असणार आहे. याची पाहाणी आम्ही आज केली असून वेंगुर्ला येथेही अतिरिक्त जागा मागितली आहे. ॲथलेटिक्सच्या सुविधा एकाच मैदानावर होण्यासाठी प्रयत्न आहे. सावंतवाडीत रमाकांत आचरेकर सरांच्या नावाने ड्रेसिंग रूम बांधण्यात आला आहे. क्रिकेटसह सर्व मैदानी खेळ खेळण्यासाठी इथे सुविधा उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न आहे. स्विमिंगपूल देखील सुरु करण्यासाठी नगराध्यक्ष श्रद्धाराजे भोंसले व क्रीडा सभापती सुधीर आडीवरेकर लक्ष घालत आहेत. खेळाच्या चांगल्या सुविधा उपलब्ध होण्यासाठी आमचा प्रयत्न आहे. बांदा, दोडामार्ग येथे देखील क्रीडा संकुलासाठी प्रयत्नशील आहोत. सावंतवाडीतील सुविधा पावासापूर्वी पुर्ण करण्याचा मानस आहे. बांद्याला अतिरिक्त जागा उपलब्ध करून देण्यासाठी मागणी केली आहे अशी माहिती त्यांनी दिली.

दरम्यान, कायमस्वरूपी मुख्याधिकारी सावंतवाडीला मिळावा यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली असून लवकरच तो उपलब्ध होईल. शहरात नळ पाणी योजने व गॅस पाईप लाईन या कामांमुळे नागरिकांची काही प्रमाणात गैरसोय होणार आहे. मात्र, काम करून घेणं आवश्यक आहे. संजू परब यांच्याशीही मी चर्चा करणार आहे. येत्या आठवड्यात नळ पाणी योजनेसह न.प.च्या कामाचा आढावा घेतला जाणार असून दोन्ही बाजुच्या नगरसेवकांना एकत्र बसवून मतभेद दूर केले जातील‌. माझी भूमिका काम कशी पूर्ण होतील यावर आहे. आरोप करण्यापासून मी अलिप्त असून कामाचा दर्जा राखण्यासाठी मी प्रयत्न करत आहे. पूढच्या आठवड्यात न.प. ला भेट देऊन पावसाळ्यापूर्वी काम पूर्ण करून घेतली जातील. सावंतवाडीचा विकास झाला पाहिजे हा उद्देश असून नागरिकांना चांगली सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी माझा प्रयत्न आहे. समन्वय घडवून आणण्याचा प्रयत्न करेन चुकलं असेल तिथे टिका झाली पाहिजे. मात्र, विकासकामात राजकारण येता नये असेही त्यांनी स्पष्ट केले. सत्ताधारी पक्षातील व्हायरल ऑडिओबाबत पत्रकारांनी विचारलं असता आपण तो ऑडिओ ऐकलेला नाही. त्यामुळे त्यावर बोलण उचित ठरणार नाही असे मत व्यक्त केले.

दरम्यान, वाळूच उत्खनन परवानगी शिवाय होऊ शकत नाही. परवाना नसताना उत्खनन होण शक्य नाही. मात्र, यासंदर्भात आढावा घेतला जाईल. तसेच दगडी खाणीवर झालेली मारहाण चुकीची असून त्याची चौकशी करून यापुढे असे प्रकार होता नयेत याची दक्षता घेण्यासाठी सुचना देईन. तर दगडी खाणींमुळे नागरिकांना त्रास होणार नाही याचीही दक्षता घेतली जाईल असे त्यांनी सांगितले.

तसेच सावंतवाडीत एकाच ठिकाणाहून वीज पुरवठा होतो. राधानगरीसह तो खारेपाटणहूनी वीज पुरवठा होण्यासाठी मी प्रयत्न केले असून सावंतवाडी व कुडाळ शहरांना पर्यायी वीज पुरवठा उपलब्ध होणार आहे. त्यामुळे आता होणारा त्रास सहन करावा लागणार नाही. येत्या पाच महिन्या नंतर आताची परिस्थिती बदलेल असाही विश्वास त्यांनी व्यक्त केला. तर, कणकवली नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी कोणत्या पक्षात जावे हा त्यांचा प्रश्न आहे‌. मात्र, शिवसेना पक्षात ते आले तर आम्ही त्यांचे निश्चितच स्वागत करू असे मत व्यक्त केले. तर आमदार प्रमोद जठार काय बोलले हे त्यांचं मत आहे‌. जिल्ह्यात महायुती आहे व ती राहील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. यावेळी आरोग्य व क्रीडा सभापती सुधीर आडीवरेकर, उद्यान सभापती मोहिनी मडगावकर, पाणी पुरवठा सभापती प्रतीक बांदेकर आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!