रयत शिक्षण संस्थेच्या श्री शिवाजी हायस्कूल, तुळस विद्यालयाचा मार्च २०२६ एस.एस.सी. परीक्षेचा निकाल ९५.२३ टक्के लागला असून २१ पैकी २० विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. विद्यालयाच्या यशस्वी निकालाबद्दल सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.
या परीक्षेत कुमार प्रतिक भिकाजी परब याने ४३७ गुण (८७.४० टक्के) मिळवत प्रथम क्रमांक पटकावला. कुमारी संस्कृती संजय तुळसकर हिने ४३३ गुण (८६.६० टक्के) मिळवत द्वितीय क्रमांक मिळविला, तर कुमार धनराज गुरुनाथ पायनाईक याने ३७० गुण (७४.०० टक्के) मिळवत तृतीय क्रमांक संपादन केला.
विद्यालयातील ८० टक्क्यांवरील २ विद्यार्थी, ७० टक्क्यांवरील १२ विद्यार्थी तसेच ६० टक्क्यांवरील १६ विद्यार्थ्यांनी यश संपादन केले आहे.
या यशाबद्दल शाळा समिती, शाळा व्यवस्थापन समिती, तुळस श्रीदेव जैतिराश्रित संस्था, सरपंच, उपसरपंच, मुख्याध्यापक, शिक्षकवृंद, शिक्षकेतर कर्मचारी, पालक शिक्षक संघ, ग्रामस्थ तसेच विद्यार्थ्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.
