महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत फेब्रुवारी – मार्च २०२६ मध्ये घेण्यात आलेल्या माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र म्हणजेच इयत्ता दहावी परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूलने १००% यशाची परंपरा कायम राखली आहे. रोझरी इंग्लिश स्कूलच्या १००% निकालाचे हे सलग २२ वे वर्ष आहे.

यावर्षी, रोझरी इंग्लिश स्कूलचे सर्व ५० विद्यार्थी – विद्यार्थीनी १० वी च्या परीक्षा निकालात यशस्वी झाले असून त्यातल्या ३९ जणांना ‘डिस्टींक्शन’ मिळाले आहे. ९ जण प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत तर २ जण द्वितीय श्रेणीतून उत्तीर्ण झाले आहेत.

रोझरी इंग्लिश स्कूलच्या कु. पार्थ बागवे याने ९७.४०% गुणांसह प्रथम क्रमांक प्राप्त केला आहे. द्वितीय क्रमांकाच्या कु. मधुरा परब हिला ९६.००% तर तृतीय क्रमांकासाठी कु. वंशिका रावले व कु. समर्थ यादव यांना प्रत्येकी ९५.८०% गुण प्राप्त झाले आहेत.

रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेच्या वतीने मुख्याध्यापक फादर ऑल्वीन गोन्साल्वीस आणि शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी सर्व यशस्वी विद्यार्थी – विद्यार्थीनींचे व त्यांच्या पालकांचे अभिनंदन केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!