सिंधुदुर्ग धर्मप्रांत २००५ साली उदयास आला. या धर्म प्रांतातील सावंतवाडी मिलाग्रीस महामंदिराचे नूतनिकरण गेल्या पाच वर्षांपासून सुरु करून आजच्या घडीला पूर्णत्वास आले आहे. या स्थापना झालेल्या ऐतिहासिक आणि पुनर्रचित ‘मिलाग्रिस कॅथेड्रल’चा भव्य उद्घाटन व आशीर्वाद सोहळा शनिवारी संपन्न झाला. या सोहळ्यासाठी ख्रिस्तधर्मीय जगतातील अनेक उच्चपदस्थ कर्डीनल्स, बिशप, धर्मगुरु आणि मान्यवर उपस्थित होते. हा ऐतिहासिक क्षण सुमारे ५ हजार भाविकांच्या उपस्थितीत साजरा झाला.

या सोहळ्याचे उद्घाटन मुंबईचे आर्चबिशप एमिरेट्स कार्डिनल ऑस्वल्ड ग्रेशियस यांच्या हस्ते संपन्न झाले. तर मुख्य मिसा अर्पण सोहळ्याचे अध्यक्षपद गोवा आणि दमणचे आर्चबिशप कार्डिनल फिलिप नेरी फेराव यांनी भूषाविले. याप्रसंगी मुंबईचे आर्चबिशप जॉन रॉड्रिग्ज, पुण्याचे बिशप सायमन अल्मेडा, अमरावतीचे बिशप मॅल्कम सिक्वेरा, बेळगावचे बिशप डेरिक, गोव्याचे बिशप सिमाव, नाशिकचे बिशप लुर्ड्स आणि सिंधुदुर्गचे पहिले बिशप एमिरेट्स ऑल्विन बर्रेटो यांच्यासह सलेशियन, जेझुइट, कॅप्यूचिन आणि फ्रान्सालियन या धार्मिक संस्थांचे प्रांतीय प्रमुख उपस्थित होते. या सोहळ्यानिमित्त शनिवारी सकाळी ७.३० ते ८.३० या वेळेत भव्य मिरवणूक काढण्यात आली. त्यानंतर सकाळी ९ वाजता नूतनीकरण केलेल्या कॅथेड्रलचा मुख्य उद्घाटन व आशीर्वाद सोहळा संपन्न झाला.

त्यानंतर दुपारी १२ पासून सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता. यामध्ये धार्मिक मान्यवर, माजी शालेय शिक्षण मंत्री आमदार दीपक केसरकर, सावंतवाडी नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा सौ. श्रद्धाराजे भोंसले, उपनगराध्यक्ष ॲड. अनिल निरवडेकर, माजी राज्यमंत्री प्रवीण भोसले, राजेसाहेब खेमसावंत भोंसले, शुभदादेवी भोंसले, युवराज लखमराजे भोंसले, माजी आमदार राजन तेली, माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर, न. प. सभापती सुधीर आडिवरेकर, प्रतीक बांदेकर, सौ. मोहिनी मडगांवकर, दीपाली भालेकर, नगरसेवक अजय गोंदावळे, देव्या सुर्याजी, देवा टेमकर, नगरसेविका सुकन्या टोपले, शर्वरी धारगळकर, ॲड. सायली दुभाषी, सुनिता पेडणेकर, स्नेहा नाईक, दुलारी रांगणेकर, माजी नगरसेवक सुरेंद्र बांदेकर, तानाजी वाडकर, कॅथेड्रलचे आर्किटेक्ट ब्रायन सोरेस, इंजिनिअर व कॉन्ट्रॅक्टर मिलिंद तसेच आजी-माजी नगरसेवक लोकप्रतिनिधी व पत्रकार बांधवांना सन्मानित करण्यात आले. याप्रसंगी माजी मंत्री आमदार दीपक केसरकर यांच्याकडून ख्रिस्ती धर्मगुरूंना शुभेच्छा देण्यात आल्या.

यावेळी सिंधुदुर्ग प्रांताचे बिशप ॲग्नेलो पिन्हेरो यांनी उपस्थितांचे आभार व्यक्त करत मिलाग्रीस कॅथेड्रलच्या पूर्णत्वासाठी योगदान देणाऱ्यांचे ऋण व्यक्त केले. या सोहळ्यामुळे सावंतवाडीच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे. या भव्य वास्तूच्या उभारणीत सर्व समाजातील नागरिकांचा आणि भाविकांचा मोलाचा सहभाग लाभला असल्याचेही त्यांनी सांगितले.यावेळी फादर मिलेट डिसोजा, विकर जनरल रेव्ह. फादर अँद्रू डिमेलो, सहाय्यक धर्मगुरू फादर अमृत, सल्लागार रेव्ह. फादर फेलिक्स लोबो, प्राचार्य रेव्ह. फादर रिचर्ड, माजी नगराध्यक्षा अनारोजीन लोबो, सावंतवाडी कॅथॉलिक असोसिएशनचे अध्यक्ष जॉय डान्टस, जिल्हा परिषद सदस्य मायकल डिसोजा, जॉनी फेराव,ऑगस्तीन फर्नांडिस, जो रॉड्रिक्स, डुमिंग डिसोजा, ग्रेगरी डान्टस, जॉन फर्नांडीस, स्टिवन डिसिल्वा, रेमी आल्मेडा, डुमिंग आल्मेडा, लॉरेन्स डिसोजा, रॉबर्ट आल्मेडा, डुमिंग डिसोजा, नेल्सन मिनेजिस, अलेक्स डिसिल्व्हा आदींसह कॅथॉलिक संस्थांचे पदाधिकारी व ख्रिस्ती बांधव हजारोंच्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!