कृपासिंधू मित्र मंडळ भटवाडी हे ३३ व्या वर्षात पदार्पण करत आहे.यावर्षी देखील शिवजयंती उत्सव तिथीनुसार मोठ्या दिमाखात साजरा करण्यात येणार आहे.

शुक्रवार दिनांक ६ मार्च २०२६ रोजी सकाळी दहा वाजता शिव मूर्तीचे पूजन होणार आहे. दुपारी चार वाजता लहान मुले व उपस्थितांचे मनोरंजक खेळ रंगणार आहेत,सायंकाळी सहा वाजता भजन व शिवरायांची आरती होणार आहे. तर रात्रौ ठीक सात वाजता लहान मुलांच्या रेकॉर्ड डान्स व विविध कलागुणांचे कार्यक्रम तसेच स्थानिक महिलांचा लेझीम कला नृत्य सादर होणार आहे. कला सादर करणाऱ्या सर्वांना प्रशस्तीपत्र मंडळाकडून देण्यात येणार आहे. तर रात्रौ ठीक नऊ वाजता ज्या चित्रपटाने कोकणची शान वाढवली,दशावतार कला साता समुद्रा पार नेली असा दशावतार चित्रपट पडद्यावर दाखवण्यात येणार आहे.

तरी जास्तीत जास्त शिवप्रेमींनी मायबाप रसिकांनी या शिवजयंतीचा लाभ घ्यावा असे आवाहन मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे. कार्यक्रम नोंदणीसाठी रेखा कांडरकर-९८९०६५४५९५, शेखर सुभेदार – ९४२३७५३०४२ यांच्याशी संपर्क साधायचा आहे. सदर शिवजयंतीचा कार्यक्रम कुडाळकर व कांडरकर यांच्या घराशेजारी काजरकोंड भटवाडी येथे होणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!