जागतिक मराठी भाषा दिनानिमित्त अमृतानुभव फाउंडेशन पुणे आयोजित विश्व मराठी भाषा कर्तुत्व संमेलन २०२६ आयोजित करण्यात आले होते.

या संमेलनामध्ये विविध क्षेत्रात मराठी भाषा, संस्कृती व राष्ट्रासाठी केलेल्या उल्लेखनीय प्रेरणादायी व आदर्श कार्याची दखल घेत मराठी समाजभूषण पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावर्षी हा पुरस्कार सौ.मानसी महेश परब- राणे यांना प्रदान करण्यात आला. मराठी भाषेच्या संवर्धनासाठी प्रचारासाठी व समाज घडणीसाठी त्यांनी दिलेल्या योगदानानिमित्त तसेच भावी पिढीस प्रेरणा मिळावी यासाठी त्यांनी केलेल्या कार्याचा गौरव तसेच त्यांचे कार्य समाजापर्यंत पोहोचवावे या हेतूने हा सन्मान करण्यात आला. शनिवार दिनांक २८फेब्रुवारी २०२६ रोजी पत्रकार भवन गांजवे चौक नवी पेठ पुणे येथे सुप्रसिद्ध पार्श्वगायक सारेगमप ज्ञानेश्वर मेश्राम यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.

यावेळी श्री राहुल पाटील – सुप्रसिद्ध वक्ते व युवा उद्योजक सांगली, श्री संदिप राक्षे – (चित्रपट निर्माता, लेखक )अध्यक्ष अमृतानुभव फाउंडेशन पुणे, स्वागताध्यक्ष व आयोजक प्रा. डॉ. बी. एन. खरात- संचालक समृद्धी पब्लिकेशन व युवा पुरस्कार विजेते महाराष्ट्र शासन, निवेदक – प्रा. डॉ. सुनील धनगर – सुप्रसिद्ध व्याख्याते व निवेदक आदि मान्यवर उपस्थित होते.सौ मानसी महेश परब- राणे यांना मराठी समाजभूषण पुरस्कार मिळाल्याने त्यांचे सर्व स्तरातून कौतुक केले जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!