जगदगुरु रामानंदाचार्य श्री स्वामी नरेंद्रचार्य जी श्री क्षेत्र नाणीजधाम यांच्या प्रेरणेतून आणि रामानंदाचार्य संप्रदाय सिंधुदुर्ग यांच्या वतीने नववर्ष प्रारंभीचे औचित्य साधून गुढीपाडव्या निमित्त वेंगुर्ला म्हापण येथे मिरवणूक काढण्यात आली होती. या मिरवणुकीला म्हापण येथून सुरुवात होऊन पाट येथील माऊली मंदिर येथे सांगता करण्यात आली. या मिरवणुकीत कुडाळ, वेंगुर्ला, सावंतवाडी, दोडामार्ग, मालवण या तालुक्यातील भक्तगणांनी विशेष देखावे सादर केले होते. शिवाय संप्रदा्याच्या वतीने होत असलेल्या देहदान आणि अवयव दान आणि इतर सेवांचा संदेश या मिरवणुकीतून देण्यात आला. यावेळी शेकडो सांप्रदायिक भक्त उपस्थित होते. म्हापण शांतादुर्गा येथे ही मिरवणूक आली असता तेथील ट्रस्टी, उपसरपंच यांनी जगदगुरु रामानंदाचार्य श्री स्वामीं नरेंद्रचार्यजी यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करत आशीर्वाद घेतले. कोणतेही गालबोट न लागता ही मिरवणूक पार पडली. यासाठी संप्रदा्यातील संग्राम सैनिकांनी आणि पोलीस प्रशासनाने योग्य ती खबरदारी घेतली होती..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!