समाजात चांगले काम करणाऱ्या व्यक्तींना योग्य सन्मान मिळणे हीच खरी समाज प्रगतीची खूण मानली जाते. याच भावनेतून श्री देवी सातेरी वाचनालय, वेतोरे यांच्या वतीने आयोजित सन्मान सोहळा उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. या कार्यक्रमाला भाजप युवा नेते विशाल परब यांची प्रमुख उपस्थिती लाभली.

गेल्या अनेक वर्षांपासून वाचन संस्कृती जपत समाजप्रबोधनाचे कार्य करणाऱ्या या वाचनालयाने शैक्षणिक, सामाजिक, प्रशासकीय तसेच सार्वजनिक क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या मान्यवरांचा सन्मान करून समाजासमोर एक आदर्श निर्माण केला.

यावेळी भाजप युवा नेते विशाल परब यांच्या हस्ते राधाकृष्ण वेतोरेकर (अध्यक्ष, श्री देवी सातेरी वाचनालय), ऋतुजा म्हाडेश्वर (ग्राम महसूल अधिकारी), अनन्या पुराणिक (सरपंच, वजराट), प्राची नाईक (सरपंच, वेतोरे), विजय नाईक (जिल्हा परिषद सदस्य) तसेच साईप्रसाद नाईक (भाजप सरचिटणीस) यांचा गौरव करण्यात आला.

आपल्या मनोगतात विशाल परब यांनी वाचनालयाच्या कार्याचे कौतुक करत, समाजात सकारात्मक बदल घडवण्यासाठी अशा संस्थांचे योगदान अत्यंत महत्त्वाचे असल्याचे सांगितले. समाजासाठी कार्य करणाऱ्या व्यक्तींना प्रोत्साहन देणे ही काळाची गरज असल्याचेही त्यांनी नमूद केले.

या कार्यक्रमाला वाचनालयाचे पदाधिकारी, स्थानिक ग्रामस्थ तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!