मानसी परब या करित असलेल्या सामाजिक कार्याची दखल घेत त्यांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समाज भूषण पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे.गेली अनेक वर्ष मानसी परब या सामाजिक कार्यात अग्रेसर आहेत. उपेक्षित, दिन दुबळ्या, गरीब कष्टकरी,लोकांसाठी सातत्याने सामाजिक भावनेतून विविध प्रकारच्या माध्यमातून त्यांनी समाजसेवेचे व्रत अखंड सुरू केले आहे. त्यांच्या या कार्याची दखल अनेक संस्थांनी घेऊन त्यांना विविध पुरस्काराने गौरविले होते. महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ रायगड जिल्हा आयोजित स्वराज्य भूमी रायगड गौरव संमेलन 2026 या संमेलनात त्यांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समाज भूषण पुरस्कार प्रदान करण्यात आला या. सोहळ्याला प्रमुख अतिथी कॅबिनेट मंत्री रोजगार हमी, फलोत्पादन आणि खार भूमी विकास मंत्री , भरत शेठ गोगावले साहेब हे होते. ज्येष्ठ अभिनेते अजय तपकिरे,उदय भाऊसाहेब वाघेरे संचालक ग्रुप ऑफ कंपनी पिंपरी -पुणे यांची प्रमुख उपस्थिती होती. या संमेलनाचे अध्यक्ष डॉक्टर विनोदराव मोरे, संस्थापक अध्यक्ष आई फाउंडेशन रायगड तर स्वागताध्यक्ष व आयोजक प्राध्यापक डॉक्टर बी. एन. खरात संचालक समृद्धी पब्लिकेशन युवा पुरस्कार विजेते तर निमंत्रक शैलेश पालकर कोकण अध्यक्ष,महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ आदी उपस्थित होते. हा कार्यक्रम शुक्रवार दिनांक 3 एप्रिल 2026 रोजी हॉटेल फाउंटन इन (लिमोनेट लीला) पोस्ट-नडगाव तर्फे बिरवाडी, मुंबई गोवा हायवे न्यू सावित्री ब्रिज जवळ तालुका महाड जिल्हा रायगड येथे संपन्न झाला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!