सावंतवाडी येथे एस.एन.आर.आर. ग्रुपतर्फे व सावंतवाडी भाजपाच्या पुरस्कराने आयोजित भव्य लेदर बॉल क्रिकेट स्पर्धेचा बक्षीस समारंभ उत्साहात पार पडला. या समारंभाला भाजपाचे युवानेते विशाल परब तसेच सावंतवाडी नगरपरिषदेचे उपनगराध्यक्ष ॲड. अनील निरवडेकर प्रमुख उपस्थित होते.

सतत १७ दिवस रंगलेल्या या स्पर्धेत सावंतवाडी, कोल्हापूर, पुणे, रत्नागिरी आणि गोवा येथील एकूण १६ संघांनी सहभाग घेतला होता. अत्यंत चुरशीच्या सामन्यांनंतर सावंतवाडीच्या ‘ओम स्पोर्ट्स’ संघाने विजेतेपद पटकावले, तर ‘एबी इलेव्हन सावंतवाडी’ संघ उपविजेता ठरला. विजेत्या संघाला १ लाख रुपये रोख रक्कम व ट्रॉफी देण्यात आली, तर उपविजेत्या संघाला ५० हजार रुपये व ट्रॉफी प्रदान करण्यात आली.

स्पर्धेतील विजेता व उपविजेता संघ तसेच सामनावीर आणि मालिकावीर खेळाडूंना विशाल परब व ॲड. अनील निरवडेकर यांच्या हस्ते बक्षिसे व ट्रॉफी देऊन गौरविण्यात आले.

या प्रसंगी केतन आजगांवकर, राजन नाईक, राजा राणे, बाबा रेडकर उपस्थित होते..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!