सिंधुदुर्ग जिल्ह्याचा मध्यवर्ती असलेला महत्त्वपुर्ण कुडाळ तालुका असून ९८ देशांत कार्यरत असलेल्या ‘व्हॉइस ऑफ मीडिया’ या जागतिक पत्रकार संघटनेच्या सिंधुदुर्ग जिल्हा कार्यकारिणी जाहीर झाल्यानंतर, संघटनेच्या कार्याला आता खऱ्या अर्थाने वेग आला आहे. कोकण विभागीय अध्यक्ष कुमार कडलग यांच्या मार्गदर्शनानुसार, जिल्ह्यातील संघटनात्मक बांधणी अधिक मजबूत करण्यासाठी तालुकास्तरावर कार्यकारिणी विस्तारण्याचा निर्णय घेण्यात आला. याचाच एक भाग म्हणून कुडाळ तालुकाध्यक्षपदी गेली १८ वर्षे पञकारिता क्षेत्रात कार्यरत असलेले संदिप प्रकाश चव्हाण यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.
गावपातळीवरील पत्रकारांना संघटनेच्या व्यासपीठावर एकत्र आणणे हा हेतु असून पत्रकारांना भेडसावणाऱ्या समस्या, त्यांच्या कामातील अडचणी समजून घेऊन त्या प्रभावीपणे मार्गी लावण्यासाठी तालुकास्तरावर सक्रिय टीम असणे आवश्यक आहे, असे मत सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष भूषण सावंत यांनी व्यक्त केले असून कुडाळ तालुकाध्यक्ष पदी गेली १८ वर्षे पञकारिता क्षेत्रात कार्यरत असलेले व सध्यस्थितीत सिंधुदुर्ग न्यूज व दैनिक सकाळ मध्ये पञकारिता करत असलेले अनुभवी संदिप प्रकाश चव्हाण यांची तरुण, तडफदार आणि धडाकेबाज पत्रकार म्हणून असलेली ओळख संघटनेसाठी मोलाची ठरेल, या उद्देशाने त्यांच्यावर ही जबाबदारी सोपवण्यात आली आहे. संदिप चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली कुडाळ तालुक्यातील शहर व ग्रामीण भागातील पत्रकार बांधव संघटित होतील आणि संघटना अधिक बलशाली होईल, अशी अपेक्षा यावेळी उपस्थित पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली.
या निवडीप्रसंगी जिल्हाध्यक्ष भूषण सावंत, शैलेश मयेकर, विष्णू धावडे, कार्याध्यक्ष संजय पिळणकर, मिलिंद धुरी व भूषण देसाई, सरचिटणीस अमित पालव, खजिनदार आनंद कांडरकर, उपाध्यक्ष सुयोग पंडित, जय भोसले व राजा दळवी, जनसंपर्क आणि प्रसिद्धीप्रमुख दीपक पटेकर, संघटक नयनेश गावडे, कार्यवाहक विजय सावंत आणि सदस्य रणजीत जाधव यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते. निवडीनंतर यश माधव यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत असून त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या आहेत.
