शिक्षण हेच विकासाचे मुख्य सूत्र असल्याचे जाणून आणि तळागाळातील विद्यार्थ्यांनाही लाभ व्हावा म्हणून श्री.विक्रांत विकासभाई सावंत(अध्यक्ष, शिक्षण प्रसारक मंडळ,सावंतवाडी) सदस्य, जि. प. सिंधुदुर्ग (माजगाव)_यांच्या संकल्पनेतून दोडामार्ग , माजगाव व सावंतवाडी केंद्रांसाठी शिष्यवृत्ती सराव परीक्षा आयोजित करण्यात आली होती.

या सराव परीक्षेसाठी तिन्ही ठिकाणी उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. दोडामार्ग इंग्लिश स्कूल येथे इ. 04 थी साठी 50 तर इ. 07 थी साठी 26 विद्यार्थी सहभागी झाले होते. या केंद्रावर परीक्षा प्रमुख म्हणून श्री. बामणीकर सर यांनी दोडामार्ग केंद्रातील शिक्षकांच्या सहकार्याने परीक्षा पार पाडली.

तसेच माजगाव केंद्रासाठी माजगाव केंद्र शाळा येथे इ. 04 थी साठी 41 तर इ. 07 थी साठी 16 विद्यार्थी सहभागी झाले होते. या केंद्रावर परीक्षा प्रमुख म्हणून केंद्रमुख्याध्यापक माजगाव श्री. बांदेकर सर यांनी माजगाव केंद्रातील शिक्षकांच्या सहकार्याने परीक्षा पार पाडली.

त्याचप्रमाणे सावंतवाडी केंद्रासाठी राणी पार्वतीदेवी हायस्कूल व ज्यु कॉलेज सावंतवाडी येथे इ. 04 थी साठी 111 तर इ. 07 थी साठी 44 विद्यार्थी सहभागी झाले होते. या केंद्रावर परीक्षा प्रमुख म्हणून श्री. शृंगारे सर यांनी प्रशालेतील सर्व शिक्षक तसेच सावंतवाडी केंद्रातील शिक्षक यांच्या सहकार्याने परीक्षा पार पाडली. या स्पर्धेसाठी एकूण चौथी इय्यतेतील 202 विद्यार्थी व सातवी इय्यतेतील 86 विद्यार्थी सहभागी झाले होते. सहभागी गुणवंत विद्यार्थ्यांना आकर्षक भेटवस्तू देऊन सन्मान करण्यात आला.

श्री. विक्रांत विकासभाई सावंत यांनी स्वतः प्रत्यक्ष भेट देऊन विद्यार्थ्यांना अंतिम परीक्षेसाठी शुभेच्छा दिल्या.

सदर परीक्षेसाठी केंद्रप्रमुख श्री कमलाकर ठाकूर , दोडामार्ग मुख्याध्यापक श्री. एस. एन. पाटील , RPD हायस्कूल मुख्याध्यापक श्रीम. एस . एस.कशाळीकर, उपप्राचार्य डॉ. सुमेधा नाईक , पर्यवेक्षक श्री. एन. जी. मुठे यांनी परीक्षा नियंत्रक म्हणून काम पाहिले.

शिक्षण प्रसारक मंडळ सावंतवाडी अध्यक्ष श्री विक्रांत विकासभाई सावंत , उपाध्यक्ष डॉ. दिनेश नागवेकर , सचिव श्री. व्ही. बी. नाईक, खजिनदार श्री. सी. एल. नाईक, शाळा समिती अध्यक्ष श्री. अमोल सावंत व सर्व संस्था सदस्य यांनी अभिनंदन केले व अंतिम परीक्षेसाठी शुभेच्छा दिल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!