श्री देव वेतोबा, सातेरी, भुमैया कला क्रीडा मंडळाच्या वतीने या शर्यतीचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत सुमारे पन्नासहून अधिक बैलगाड्यांनी सहभाग घेतला होता, ज्यामुळे वातावरणात उत्सुकता आणि रोमांच निर्माण झाला होता.

या शर्यतीचे उद्घाटन आरवलीचे जेष्ठ ग्रामस्थ भाई उर्फ रघुवीर मंत्री यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आले, तर भाजप युवा नेते विशाल परब यांच्या हस्ते फित कापून स्पर्धेची सुरुवात झाली.

यावेळी भाजप युवा नेते विशाल परब यांच्यासोबत भाई उर्फ रघुवीर मंत्री, आरवली सरपंच शेखर कुडव, तलाठी गावडे, मयुर आरोलकर, श्रीकांत राजाध्यक्ष आदी मान्यवर उपस्थित होते.

स्पर्धेतील विशेष आकर्षण ठरली ती पावशी येथील वाटवे यांच्या मालकीची विजयी जोडी. या जोडीने अवघ्या १ मिनिट ७ सेकंदात ६०० मीटर अंतर पूर्ण करत प्रेक्षकांची मने जिंकली.

या बैलगाडा शर्यतीचा आनंद लुटण्यासाठी परिसरातील ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली होती, त्यामुळे संपूर्ण परिसर उत्साहाने गजबजून गेला होता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!