कार्य सन्मान..राष्ट्राचा अभिमान..

हे ब्रीद जोपासत महाराष्ट्र श्रम कामगार संघटना गेली अनेक वर्षे कार्य करत आहे. या संस्थेच्या वतीने अथक परिश्रम, कष्ट, समर्पण आणि कर्तृत्व भावनेचा गौरव करण्यासाठी भारत श्री कार्य गौरव सोहळा पुणे येथे आयोजित करण्यात आला होता.

गेली अनेक वर्षे समाज सेवेचे व्रत जोपासत कष्टकऱ्यांना, कामगार यांच्या हक्काना न्याय देण्यासाठी सतत झटणाऱ्या मानसी परब – राणे यांना यावर्षी महाराष्ट्र नारिशक्ती गौरव पुरस्कार पुरस्कार प्रदान करण्यात आला. हा सोहळा रविवारी १७ मे रोजी सकाळी १० वाजता, पत्रकार भवन गांजवे चौक, नवीन पेठ पुणे येथे आंतरराष्ट्रीय कामगार दिनानिमित्त आयोजित करण्यात आला होता.

हा पुरस्कार अभिनेते, निर्माता, अध्यक्ष, अखिल भारतीय मराठी चित्रपट महासंघ मा. मेघराज भोसले, अभिनेता नितीन घारे, अभिनेत्री मृणाल कुलकर्णी यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.

हा पुरस्कार माझा नसून जे कष्टकरी, कामगार माझे बांधव आहेत त्यांचा आहे. ही सेवा अशीच निरंतर चालू राहणार आहे. असा विश्वास यावेळी मानसी परब -राणे यांनी व्यक्त केला. त्यांना मिळालेल्या या पुरस्काराचे सर्वत्र कौतुक केले जात आहे..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!