होय वारसा आहे संघर्षाचा.. वारसा आहे सामाजिक जाणीवेचा.. वारसा आहे उपेक्षित, गरजू व्यक्तींच्या मदतीचा..वारसा आहे शैक्षणिक क्रांतीचा.. वारसा आहे युवा रोजगार निर्मितीचा..
अगदी हा वारसा चालत आला आहे तो आजोबा भाईसाहेब सावंत, वडील विकासभाई सावंत आणि आता विक्रांत सावंत यांच्यापर्यंत..
वारसाने मिळालं हे म्हणताना सहज वाटत मात्र ज्या वेळी एखादी गोष्ट वारसाने मिळते ती जपून ठेवणे सुद्धा तेवढीच महत्वाची असते. तो वारसा एवढा सहजा सहजी मिळत नसतो त्यासाठी संघर्षाच्या वणव्यातून चालत जावं लागत. कधी कधी या वणव्याची धग ही सहन करत आपला मार्ग पार करत ध्येयापर्यंत पोहचावे लागते..
हा वारसा सुरु झाला तो मराठा मोर्चा या समाजाच्या हिताच्या लढ्याने. या लढ्यात विक्रांत सावंत यांनी अग्रभागी राहत आपली वेगळी छाप पाडली. या मोर्चाने त्यांनी आपल्या नेतृत्व गुणांची झलक दाखवली. वारसा संघर्षाचा असल्याने रस्त्यावर उतरून न्यायासाठी मनामध्ये कोणताही किंतु परंतु नव्हता. ध्येय एकच आपल्या समाजाला न्याय मिळवून देणे. आपण ज्या समाजामध्ये जन्माला येतो त्या समाजाप्रती नेहमीच देण लागतो हे मनोमन ठरवून त्यांनी या लढ्यामध्ये सर्वस्व झोकून दिल..
ज्यावेळी सामाजिक कार्यात झेप घेतली जात होती त्यावेळी वैयक्तिक आयुष्यात मात्र वादळे उठली होती. अनेक दुःखद घटनाना सामोरे जावे लागले. मात्र त्या वादळाना सुद्धा दिशा बदलावी लागली, कारण समोर एक निर्भीड योद्धा उभा होता. त्या वादळाना ठणकावून सांगत की कितीही या आणि कशीही या ना मी डगमगणार ना तुम्हाला शरण जाणार. मी एक योद्धा आहे आणि मी तुमच्यावर मात करत माझ्या ध्येयापर्यंत पोचणार..
यावेळेपर्यंत सक्रिय राजकारणात आपली छाप पाडावी यासाठी त्यांनी कधी शॉर्टकट स्वीकारला नाही. त्यासाठी त्यांनी वडील विकासभाई सावंत यांच्या सोबत राजकारणाचे आणि समाजकारणाचे बाळकडू घेत त्यांनी आपला मार्ग निवडला. त्यात वेळोवेळी राजकारण कमी आणि समाजकारण जास्तच पाहायला मिळालं. त्या काळात वडिलांचे छत्र हरपलं. विकासभाई सावंत यांच्या जाण्याने एक मार्गदर्शकाची पोकळी निर्माण झाली. ती पोकळी भरून काढणे कोणालाच शक्य नाही मात्र वारसा संघर्षाचा असल्याने त्यावर देखील त्यांनी मात केली. जिल्हा परिषद निवडणुकीत त्यांनी घवघवीत यश मिळवत आजोबा भाईसाहेब सावंत, वडील विकासभाई सावंत यांच्या पावलावर पाऊल ठेवले..
दुसरीकडे शैक्षणिक क्षेत्रात क्रांती घडली पाहिजे, गोरगरीब विद्यार्थ्यांना कमी खर्चात शिक्षण मिळाले पाहिजे यासाठी शिक्षण प्रसारक मंडळ याच्या माध्यमातून आज हजारो विद्यार्थी घडविले गेले. याच शिक्षण प्रसारक मंडळाची अध्यक्ष पदाचि धुरा सांभाळताना त्यांनी विद्यार्थ्यांचे हिताचे निर्णय घेत शिक्षण त्यांनी अधिकच सुरस केले.
जात, धर्म, पंथ, यापलीकडे जात इथला युवक स्वावलंबी बनला पाहिजे ही विक्रांत सावंत यांची मोठी इच्छा. इथला युवक गोव्याच्या अर्थकारणावर अवलंबून न राहता इथल्या मातीच्या, इथल्या संस्कृतीच्या, इथल्या रोजगारीच्या संधी उपलब्ध करून देणारा बनला पाहिजे. भविष्यात नक्कीच यावर विचार करून रोजगार निर्मितीचा त्यांचा मानस आहे. हा मानस पूर्ण होईल हा ठाम विश्वास देखील त्यांना आहे..
अश्या या योध्याला समस्त जिल्ह्याच्या वतीने मालवणी मुलुख न्यूज चॅनेल च्या वतीने वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा…..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!