वेंगुर्ला बेळगाव हायवे रोड कोलगाव येथील धुरीवाडी येथील पूल जीर्ण झालेले आहे. अश्यातच पुलाचा खालचा भाग हा कमकुवत होत चालला. साधारण १० वर्षांपूर्वी मोठ्या प्रमाणात पाऊस पडल्याने मोठा पूर आला होता. त्यावेळी या पुलाच बरंचस नुकसान झालं होत. आतासुद्धा तीच परिस्थिती पाहायला मिळत आहे.

पुलाच्या वरून मोठ्या प्रमाणात वाहनाची वर्दळ चालू असते. पुलाच्या एका बाजूला खोदकाम करण्यात आले होते. तिथेसूद्धा रस्ता खचलेला पाहायला मिळत आहे. अश्यावेळी एखादा मोठा अपघात घडण्याची वाट प्रशासन बघत आहे का…अशी आता नागरिकांकडून विचारणा होत आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने यात लक्ष घालून योग्य ती उपाययोजना करणे गरजेचे आहे. पावसाळ्यात या पुलाच्या कडा पडू शकतात. आताच कडेचे दगड कोसळताना पाहायला मिळत आहेत. अश्यावेळी अपघात घडला तर याला जबाबदार कोण.. हा प्रश्न उभा राहिला आहे..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!