आरपीडी हायस्कुल व ज्युनिअर कॉलेजच्या प्राध्यापक आणि शिक्षकांनी घडवलेली मुले आज देश -विदेशात विविध उच्च पदावर यशस्वीपणे कार्यरत आहेत. येथील शिक्षकांनी घेतलेली मेहनत या यशामागे आहे. इथल्या शिक्षकांकडून शिक्षण घेण्याचे भाग्य मलाही लाभले. गुरुपौर्णिमेचे औचित्य साधून अश्या थोर गुरीजनांचा गौरव करताना सार्थ अभिमान वाटतो असे उदगार शिक्षण प्रसारक मंडळ, सावंतवाडीचे अध्यक्ष विक्रांत सावंत यांनी काढले.
आरपीडी हायस्कुलच्या उच्च माध्यमिक सांस्कृतिक विभागातर्फे गुरुपौर्णिमेनिमित्त आणि ज्युनिअर कॉलेजच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त निवृत्त प्राध्यापकांच्या सत्कार सोहळ्याचे आयोजन केले होते. शाळेच्या सभागृहात अध्यक्षीय स्थानावरून सावंत बोलत होते. यावेळी निवृत्त माजी प्राचार्य व्ही. बी. नाईक, निवृत्त प्राध्यापक डॉ. दिनेश नागवेकर, माजी उप प्राचार्य नारायण देवरकर, प्रा.धिरेंद्र होळीकर,प्रा.सुरेश म्हसकर, प्रा. सतीश बागवे, माजी उप प्राचार्य बाळासाहेब नंदिहळी, प्रा. काकासाहेब चौगुले, प्रा. एल. पी. पाटील, प्रा. प्रवीण बांदेकर, प्रा. आर. के. संकपाळ आदींचा गौरव केला.
सचिव नाईक यांनी कै. भाईसाहेब सावंत व कै. विकास सावंत यांनी या संस्थेचा वटवृक्ष करण्यासाठी अपार मेहनत घेतली. तोच वारसा नवीन पिढीही पुढे नेत आहे असे प्रतिपादन केले.
संस्थेचे खजिनदार सी. एल. नाईक, शालेय समिती अध्यक्ष अमोल सावंत, संस्था सदस्य प्रा. सतीश बागवे, मुख्याध्यापक संप्रवी कशाळीकर, प्र. मुख्याधिपीका डॉ. सुमेधा नाईक, माजी विद्यार्थी सी ए लक्ष्मण नाईक, श्री. सुर्वे, पर्यवेक्षक नामदेव मुठे उपस्थित होते. प्र. प्राचार्या डॉ. सुमेधा नाईक धुरी यांनी प्रास्ताविक केले. प्रा.माया नाईक यांनी सूत्रसंचालन केले तर प्रा. वामन ठाकूर यांनी आभार मानले..
Feeling lucky? Maybe bggbetluck can help. Haven’t had a super great experience. Might be your thing though. Test your luck now at bggbetluck.