श्री औदुंबर स्वामी समर्थ मंदिर हे एक महत्त्वाचे अध्यात्मिक केंद्र असून मनःशांती मिळण्यासाठी हे अत्यंत उत्तम स्थान आहे. या मंदिराच्या विकासासाठी आणि कार्यासाठी माझ्याकडून जे काही सहकार्य लागेल, ते निश्चितपणे केले जाईल, अशी ग्वाही जिल्हा परिषद सदस्य तथा भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष संदीप गावडे यांनी दिली.

गुरुपौर्णिमेचे औचित्य साधून आणि आपल्या वाढदिवसाचे निमित्त साधून संदीप गावडे यांनी सावंतवाडी पोलीस ठाण्याच्या आवारातील औदुंबर स्वामी समर्थ मंदिराला भेट दिली. यावेळी

उत्सव समितीच्यावतीने अमोल टेंबकर यांच्या हस्ते संदीप गावडे यांचा पुष्पगुच्छ देऊन विशेष सन्मान करण्यात आला.

गुरुपौर्णिमेनिमित्त मंदिरात विविध धार्मिक आणि आध्यात्मिक कार्यक्रमांचे भव्य आयोजन करण्यात आले होते.

या धार्मिक सोहळ्यास सावंतवाडी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अमोल चव्हाण, सहाय्यक पोलीस निरीक्षक जयेश खंदरकर, पोलीस उपनिरीक्षक हर्षद हिंगे, सहाय्यक पोलीस निरीक्षक मनोज राऊत यांच्यासह पंचायत समिती उपसभापती गौरव मुळीक, नगरसेविका नीलम नाईक, ॲड. सायली दुभाषी, अजय गोंदावळे, स्नेहा नाईक, तौकीर शेख, माजी नगरसेवक ॲड. परिमल नाईक, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संजू परब, ठाकरे शिवसेनेचे विधानसभा प्रमुख रुपेश राऊळ, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष अभय मालवणकर आदी विविध पक्षांचे प्रमुख पदाधिकारी व लोकप्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

हा सोहळा यशस्वी करण्यासाठी उत्सव समितीचे पदाधिकारी अमोल टेंबकर, भुवन नाईक, हेमंत पांगम, अक्षय मिशाळ, मृणाल पावसकर, सचिन मोरजकर, आनंद काष्टे, यश गाटे, प्रशांत सावंत, ओम टेंबकर, सूरज राऊळ, निखिल माळकर, नागेश पाटील, अमित राऊळ यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी विशेष परिश्रम घेतले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!