सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या शैक्षणिक सामाजिक उद्योग व्यावसायिक जडणघडणीमध्ये लोकमान्य ट्रस्ट चा वाटा मोठा आहे या ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष किरण ठाकूर यांनी या भागातील तरुण-तरुणींच्या शैक्षणिक विकासाच्या दृष्टीने बिझनेस मॅनेजमेंट व हॉटेल मॅनेजमेंट यासारखी कॉलेज सुरू करून खऱ्या अर्थाने विद्यार्थ्यांना शिक्षणाचे नवे दालन निर्माण केले विद्यार्थ्यांनी शालेय जीवनात जे यश मिळाले ते यश आता कॉलेज जीवनात टिकवण्याच्या दृष्टीने सातत्याने प्रयत्न करायला हवा देशभक्त शंकरराव गवाणकर कॉलेज ऑफ कॉमर्स हे कॉलेज दर्जेदार आणि तुमच्या यशाचा शिखर उंचावणारे असे आहे असे मत सावंतवाडी पोलीस निरीक्षक अमोल चव्हाण यांनी व्यक्त केले

सावंतवाडी येथील लोकमान्य टिळक संचलित देशभक्त शंकरराव गवाणकर कॉलेज ऑफ कॉमर्स या कॉलेजच्या प्रथम वर्षाच्या बॅचचे फ्रेशर पार्टी कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे पोलीस निरीक्षक अमोल चव्हाण तर अध्यक्षस्थानी संवाद तरुण भारतचे सावंतवाडी प्रतिनिधी व कोकण मराठी साहित्य परिषदेचे जिल्हा सचिव ॲड संतोष सावंत प्राचार्य यशोधन गवस आधी व्यासपीठावर उपस्थित होते यावेळी श्री चव्हाण पुढे म्हणाले गेली 16 वर्ष सावंतवाडी लोकमान्य टिळक संचालित देशभक्त शंकराव गवाणकर कॉलेज ऑफ कॉमर्स सुरू आहे या संस्थेचे अध्यक्ष किरण ठाकूर यांनी व्यापक दृष्टिकोन ठेवून बिजनेस मॅनेजमेंट आणि हॉटेल मॅनेजमेंट अशी दोन कॉलेज सुरू केली भविष्याचा आणि वर्तमान काळाचा योग्य विचार करून येथील विद्यार्थ्यांना शिक्षणाची नवी क्षितिजे आपल्याच भागात उपलब्ध व्हावी या हेतूने सुरू केली निश्चितपणे हे कॉलेज एक दर्जेदार असे कॉलेज आहे विद्यार्थ्यांनी आपण शालेय जीवनात जे यश मिळाले ते कायम टिकवण्यासाठी प्रयत्न करायला हवेत ताण-तणाव न घेता आनंदाने आपले शिक्षण कसे पूर्ण करता येईल हा विचार करून ही पार्टी म्हणजे शाळेचा कॉलेजचा पहिला दिवस तुमचा आहे पाश्चात्य संस्कृती आपल्या भागात आली असली तरी आपली ही संस्कृती आज पाश्चात्य देशाने स्वीकारली आहे विद्यार्थ्यांनी अभ्यासाकडे लक्ष देऊन आपले करिअर मध्ये यश गाठायला हवे असे ते म्हणाले

तुम्ही क्षेत्र योग्य निवडलात..

संवाद तरुण भारतचे सावंतवाडी प्रतिनिधी ॲड संतोष सावंत म्हणाले

आज प्रत्येक बाबतीत आपण व्यवस्थापन नियोजन करतो आणि त्यानुसारच आज आपण आपली पाऊल खुणा टाकत असतो त्यामुळे विद्यार्थ्यांनी बारावीपर्यंत शिक्षण घेऊन आज तुम्ही खऱ्या अर्थाने तुमचे करिअर योग्य दिशेने निवडले आहे आज जगात बिजनेस मॅनेजमेंट हे असं व्यावसायिक अभ्यासक्रम आहे की जिथे तुम्हाला तुमच्या यशाच्या वाटा खुल्या करणारे आहेत प्रत्येक क्षेत्रात इव्हेंट मॅनेजमेंट चा काळ आला आहे त्यामुळे तुम्ही बिझनेस मॅनेजमेंट हा व्यवसायिक अभ्यासक्रम तुम्ही निवडून तुम्ही पहिली पायरी यशाची गाठली आहे आता तुम्हाला आनंददायी मुक्त वातावरणात तुमच्या यशाच्या वाटा चोखं दळायला हव्यात तुम्ही अफाट मेहनत घ्याल आणि जेव्हा तुमचे आई-वडील तसेच या कॉलेजची निर्मिती करून ज्यांनी या जिल्ह्यात हे कॉलेज सुरू केले ते आपले वडीलधारी गुरु आहेत ते संस्थेचे अध्यक्ष किरण ठाकूर या कॉलेजचे प्राचार्य शिक्षक कर्मचारी वर्ग यांचा आदर आणि त्यांचा सन्मान राखा तुम्ही व्यवस्थापनातले राजा बना यासाठी आपल्या मूळ गाभा काय आहे याचा शोध घ्या परमेश्वर आपल्या सोबतीला यायला हवा तर आपण आपल्या वागणे बोलणे आणि त्याचबरोबर राहणीमान हेच खरे व्यवस्थापनाची गुरुकिल्ली आहे जेव्हा तुम्ही उत्तम रित्या मेहनत आणि कष्ट कराल तेव्हा परमेश्वर तुमची साथ नेहमी देईल असे ते म्हणाले यावेळी प्रास्ताविक प्राचार्य यशोधन गवस यांनी केले तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दीक्षा काकतकर गौरव गावडे तर आभार प्रा साई प्रसाद पंडित यांनी मानले यावेळी अस्मिता गवस साईप्रसाद पंडित आनंद नाईक शैलेश गावडे मेघा मयेकर तृप्ती नाईक आदी प्राध्यापक कर्मचारी विद्यार्थी उपस्थित होते हा इव्हेंट 14 वी च्या विद्यार्थ्यांनी यशस्वीरित्या नियोजन केले

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!