पुणे येथे झालेल्या १७ व्या मिमांसा एज्युकेशनल कॉन्क्लेव्ह अँड स्कूल अवॉर्ड्स सोहळ्यात यशवंतराव भोसले सैनिक स्कूलला ‘बेस्ट इमर्जिंग स्कूल’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. शाळेचे प्राचार्य सॅव्हीओ फर्नांडिस यांनी हा पुरस्कार स्वीकारला. राज्यभरातून प्राप्त झालेल्या ५०० हून अधिक नामांकनांमधून शाळेची या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली.

मिमांसा हे मिमांसा एज्युकेटर्स यांच्या माध्यमातून कार्यरत असलेले महाराष्ट्रातील शिक्षण क्षेत्राशी संबंधित व्यासपीठ आहे. शिक्षक, शाळा, शैक्षणिक संस्था आणि शिक्षण क्षेत्रातील नेतृत्व यांना एकत्र आणणे, शैक्षणिक गुणवत्तेला प्रोत्साहन देणे आणि उल्लेखनीय कार्याचा गौरव करणे हा या उपक्रमाचा प्रमुख उद्देश आहे. याच माध्यमातून मिमांसा एज्युकेशनल कॉन्क्लेव्ह अँड स्कूल अवॉर्ड्स आयोजित करण्यात येतात.

१७ वा मिमांसा एज्युकेशनल कॉन्क्लेव्ह अँड स्कूल अवॉर्ड्स सोहळा ८ ऑगस्ट रोजी पुणे येथील कोरिंथियन्स रिसॉर्टमध्ये पार पडला. गुणवत्तापूर्ण शिक्षण, शिस्त, विद्यार्थी विकास आणि विविध शैक्षणिक उपक्रमांच्या माध्यमातून शाळेने केलेल्या उल्लेखनीय कार्याची दखल घेत हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. या सन्मानामुळे संस्थेच्या शैक्षणिक वाटचालीत आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला आहे.

या उल्लेखनीय कामगिरीबद्दल संस्थेचे कार्याध्यक्ष अच्युत सावंत भोसले, अध्यक्षा ऍड. अस्मिता सावंत भोसले, सचिव संजीव देसाई यांनी शाळेचे प्राचार्य, शिक्षक व विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आणि पुढील उज्वल भवितव्यासाठी शुभेच्छा दिल्या.

One thought on “आणखी एक मानाचा तुरा भोसले सैनिक स्कूल ठरले ‘बेस्ट इमर्जिंग स्कूल’!”
  1. Finding a bookmaker that truly understands what local bettors need can be tough but this site gets it right. The odds are competitive and the payment methods match exactly what we use day to day. Smooth betting experience from start to finish. ngbetonly

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!