सावंतवाडी तहसीलदार कार्यालय, सावंतवाडी पंचायत समिती कार्यालय तसेच सावंतवाडी नगरपरिषद येथे विविध मागण्यांसाठी सुरू असलेल्या उपोषणांची शिवसेना जिल्हाप्रमुख श्री. संजू परब यांनी भेट घेऊन उपोषणकर्त्यांशी संवाद साधला.

यावेळी उपोषणकर्त्यांच्या मागण्या व समस्या जाणून घेत संजू परब यांनी संबंधित प्रशासकीय अधिकाऱ्यांशी सकारात्मक चर्चा केली. उपोषणकर्त्यांच्या मागण्यांवर योग्य तो तोडगा काढण्यासाठी प्रशासनाकडून आवश्यक कार्यवाही करण्याबाबत त्यांनी पाठपुरावा केला.

संजू परब यांच्या मध्यस्थीमुळे विविध उपोषणांतील प्रश्नांवर सकारात्मक चर्चा होऊन योग्य तो तोडगा काढण्याचा मार्ग मोकळा झाला. उपोषणकर्त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रशासन आणि जनतेमध्ये समन्वय साधण्याचे काम संजू परब यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!