माजी मुख्यमंत्री, विद्यमान खासदार माझे वडील नारायण राणे साहेब यांचं स्वप्न होत रेडी बंदर सुरु करण्याचं. काही तांत्रिक कारणामुळे ते होऊ शकलं नाही. मात्र आता मी त्याच खात्याचा मंत्री असल्याने आता कोणतीही अडचण येणार नाही. येत्या काळात १०० टक्के क्षमतेने हे बंदर सुरु होणार आहे. जेव्हा बंदराचा विकास होतो त्यावेळी तिथल्या नागरिकांचा कसा विकास होतो हे आपण गुजरात राज्याकडे पाहू शकतो. त्याच धर्तीवर आपण रेडी बंदर आणि देवगड बंदर यांचा प्रश्न लवकरच मार्गी लावणार आहे. असे पालकमंत्री नितेश राणे यांनी तळवणे येथील ‘झोया मरीन’ जहाज बांधणी प्रकल्पाच्या उदघाटन प्रसंगी सांगितले.

शिवाय शिरोडा येथे लवकरच ५ स्टार हॉटेल सुरु करण्यात येणार आहे. यामुळे निश्चित इथल्या स्थानिक युवांना रोजगार उपलब्ध होणार आहे. यासाठी वरिष्ठ पातळीवर बैठक झाली असून हा प्रकल्प सुद्धा पूर्णत्वास येणार आहे. इथला तरुण इथेच थांबून त्यांना रोजगार कसा उपलब्ध करून देता येईल यासाठीच माझे प्रयत्न चालू आहेत. यासाठी सर्व युवांनी आणि जिल्ह्यातील सर्वच नागरिकांनी आमच्या सरकारच्या मागे भक्कमपणे पाठीशी उभे राहावे असे आवाहन देखील यावेळी नितेश राणे यांनी केले..

One thought on “रेडी येथील बंदर लवकरच सुरु करणार – नितेश राणे”
  1. Downloading this app was the easiest part of my day honestly. It runs perfectly on my Android phone without eating up all my storage space. I love being able to manage my account and place wagers while on the move without any lag. Perfect for anyone who wants flexibility in their daily routine. dan777apk

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!