जिल्ह्यातील नादुरुस्त BSNL टॉवर, त्यातून निर्माण होणाऱ्या कनेक्टिव्हिटीच्या समस्या तसेच आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर दूरसंचार सेवा अखंडित राहण्यासाठी आवश्यक उपाययोजनांचा आढावा घेण्यात आला. गणेशभक्तांच्या मोठ्या संख्येने होणाऱ्या आगमनाच्या पार्श्वभूमीवर कोणत्याही परिस्थितीत दूरसंचार सेवा विस्कळीत होऊ नये, यासाठी संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक ती दक्षता घेण्याचे निर्देश दिले.

खंडित वीजपुरवठ्यामुळे BSNL टॉवरची सेवा प्रभावित होऊ नये, यासाठी महावितरणच्या अधिकाऱ्यांनी समन्वयाने कार्यवाही करावी तसेच ज्या टॉवरना अद्याप वीजपुरवठा उपलब्ध झालेला नाही, तेथील प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले.

या बैठकीस जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे, जिल्हा परिषद अध्यक्ष प्रमोद कामत, उपाध्यक्ष दादा साईल,श्री. सतीश सावंत तसेच BSNL व महावितरणचे अधिकारी उपस्थित होते.

2 thoughts on “सिंधुदुर्ग जिल्ह्यातील BSNL दूरसंचार सेवांच्या अनुषंगाने पालकमंत्री नितेश राणे अध्यक्षतेखाली घेण्यात आली आढावा बैठक..”
  1. I have tried quite a few platforms over the years and this one stands out for all the right reasons. The games run smoothly on my device and the support team handles every question with a smile. It is refreshing to find a spot that values player enjoyment over quick cash grabs. My go to for stress free fun. 77winbet

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!