तळवडे भजनप्रेमी आणि ग्रामस्थ यांच्या वतीने नॉनस्टॉप चक्रीभजन महोत्सव तळवडे याचे आयोजन करण्यात आले आहे.

लौकिक प्राप्त जेष्ठ बुवांचा आध्यात्मिक, पारंपारिक, डबलबारी, भजनस्पर्धा तसेच ध्वनी फितीच्या माध्यमातून परमेश्वरची भजनप्रेमी सेवा करत भजन रसिकांच्या मनावर गारुड करून श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले अश्या नामांकित बुवांची नॉनस्टॉप चक्रीय भजने सादर होणार आहेत.

यात बुवा श्री. काका साटेलकर, बुवा श्री संतोष रेडकर, बुवा श्री संजय गावडे, बुवा श्री विजय गावडे, बुवा श्री विजय माधव, बुवा श्री उदय नागडे हे बुवा सहभागी होणार आहेत.

या संपूर्ण महोत्सवाचे निवेदन प्रा. वैभव खानोलकर करणार आहेत.

नॉनस्टॉप चक्रीभजन महोत्सवाचा लाभ सर्व भजन प्रेमीनी घ्यावा असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!