भाजपा महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष मा. रविंद्र दादा चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली सिंधुदुर्ग जिल्ह्यात ‘सेवा अभियान’ राबविण्यात येत आहे. या अभियानांतर्गत जिल्ह्यातील प्रलंबित विकासकामे व नागरिकांच्या विविध प्रश्नांबाबत निवेदने सादर करण्यात येत आहेत.

*या उपक्रमांतर्गत भाजपा महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष मा. रविंद्र दादा चव्हाण यांचे स्वीय सहाय्यक साखरे साहेब तसेच महाराष्ट्र विधान परिषद सदस्य, भाजपा कोकण विभागाचे संयोजक व प्रदेश प्रवक्ते प्रमोद जठार यांच्याकडे निवेदन सुपूर्द करताना भाजपा जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, महाराष्ट्र भाजपा युवा नेते विशालजी परब, सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी, सावंतवाडी उपनगराध्यक्ष ॲड. अनिल निरवडेकर, जि. प. सदस्य संदीप गावडे, कासचे सरपंच प्रविण पंडित, माजी जि. प. सदस्य पंढरी राऊळ, पंचायत समिती सदस्य महेश धुरी, बांदा मंडल अध्यक्ष मधुकर देसाई, सावंतवाडी मंडल अध्यक्ष सुधीर आडिवरेकर आदी मान्यवर उपस्थित होते.*

आज सोमवार, दि. २४ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी १० ते दुपारी २ या वेळेत सावंतवाडी येथील काझी शहाबुद्दीन हॉल येथे हे अभियान आयोजित करण्यात आले आहे.

या वेळी महाराष्ट्र विधान परिषद सदस्य तथा भाजपा कोकण विभागाचे संयोजक व प्रदेश प्रवक्ते प्रमोद जठार तसेच संतोष साखरे नागरिकांकडून निवेदने स्वीकारणार आहेत. जिल्ह्यातील नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन आपल्या प्रलंबित प्रश्नांची निवेदने सादर करावीत, असे आवाहन करण्यात आले आहे.

“नागरिकांच्या प्रश्नांना प्राधान्य देत प्रलंबित विकासकामांना गती देण्यासाठी ‘सेवा अभियान’ महत्त्वपूर्ण ठरणार आहे,” अशी भावना भाजपा कार्यकर्त्यांकडून व्यक्त करण्यात येत आहे.

2 thoughts on “सावंतवाडी मतदारसंघात ‘सेवा अभियानाला’ जोरदार सुरुवात..”
  1. Joining this place felt like discovering a hidden gem for weekend players. The welcome bonus matched perfectly with my budget and the live dealers added such a vibrant atmosphere to my evenings. mxganarclub

  2. As someone who follows South American football closely, I need a reliable app that handles my bets during night games. This one delivers every time with secure transactions and a layout that just makes sense. Perfect for casual fans and regulars alike. betssonperuapp

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!